…अन्यथा ४८ जागा लढण्याचीही आमची तयारी- प्रकाश आंबेडकर

Tushar Gandhi's statement rejecting parliamentary democracy
Tushar Gandhi's statement rejecting parliamentary democracy

Prakash Ambedkar–जागावाटपाबद्दल आघाडीत लवकरात लवकर निर्णय होणे अपेक्षित आहे. अन्यथा, लोकसभेच्या (Loksabha) सर्व ४८ जागा लढण्याचीही आमची तयारी आहे, अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahoojan Aghadi) नेते प्रकाश आंबेडकर(Prakash Ambedkar) यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत मांडली. (Otherwise, we are also ready to fight for 48 seats)

पुण्यात बोलताना आंबेडकर म्हणाले, मी कोणत्याही मतदारसंघातून लढू शकतो. अकोला(Akola), मुंबई(Mumbai), पुणेच (Pune) काय देशातल्या कोणत्याही लोकसभा मतदारसंघातून लढण्याची माझी तयारी आहे. त्यामुळे कुणी माझी चिंता करू नये. आघाडीकडून महाराष्ट्रातील जागावाटपाबाबत लवकरात लवकर निर्णय व्हायला हवा. जागावाटपाचे काय झाले, हे संबंधित पक्षांनी सांगायला हवे. कोण किती जागा लढविणार, हे स्पष्ट झाले पाहिजे. सगळय़ा गोष्टी क्लीअर करायला हव्यात. अन्यथा, वंचितची महाराष्ट्रात सर्व जागांवर लढण्याची तयारी आहे. 

अधिक वाचा  अण्णा हजारेंचं मंदिरं उघडण्यासाठी आंदोलनाचा इशारा देणं ही बाब अनाकलनीय

राममंदिराच्या (Ram Temple) निमंत्रणाबाबत बोलताना ते म्हणाले, अयोध्येतील (ayodhya) रामलल्लाच्या (Ram Lallla) प्रतिष्ठापणेचे  मला अजून निमंत्रण आलेले नाही. मी वर्तमानपत्रात निमंत्रण येणार असल्याचे वाचले आहे. त्यामुळे निमंत्रणाची वाट पाहत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांनी त्या दिवशी दिवाळी साजरी करायला सांगितली आहे. मोदींनी या पूर्वी टाळय़ा वाजवा, थाळय़ा वाजवा म्हणून सांगितले. आम्ही त्यांचा सल्ला ऐकला होता. त्यांचे आत्ताचे आवाहनही आम्ही मान्य करू. पण देशात अनेक कुटुंबे ही दारिद्रय़रेषेखालील आहेत. त्यांना मोदींनी प्रत्येकी एक हजार रुपये द्यावेत. म्हणजे त्यांना घरात गोडधोड करता येईल आणि दिवाळी साजरी करता येईल. 

तलाठी भरतीवरून सुरू असलेल्या वादावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. मध्यंतरी मी मुख्यमंत्र्यांना भेटलो होतो. परीक्षा आणि नोकरभरतीत पोर्टलच्या माध्यमातून नावे जाहीर करा, अशी विनंती मी केली होती. ही विनंती त्यांनी मान्य केली होती. सरकारला वाद नको असेल, तर पोर्टल सिस्टीम आणायला हवी. परीक्षा झाली, तर रँकवाईज त्यांची नावे डिस्प्ले करायला हवीत. 36 पोस्ट असेल, तर रँकवाईज नावे लागतील. वाद होणार नाही, असे मत त्यांनी नोंदविले. 

अधिक वाचा  नारायण राणे, राज ठाकरे, छगन भुजबळ गेले तरी शिवसेनेला काही फरक पडला नाही

…तर जनता विरोधात जाईल 

आता आरक्षण द्यायचे म्हटले, तर सुप्रीम कोर्टाला विचारल्याशिवाय देता येणार नाही. कारण कोर्टाने तसा निर्णय घेतला आहे. राज्य मागासवर्ग कमिशनने अहवाल दिला, तरी तो अहवाल कोर्टात द्यावा लागणार आहे. तो न्यायालयाने मान्य केला, तरच आरक्षण मिळू शकते, हे सरकारने स्पष्ट केले पाहिजे. प्रामाणिकता ठेवली तर महाराष्ट्रातील जनता ऐकेल. तुम्ही नुसते फसवत राहिलात, तर लोक तुमच्याविरोधात उभे राहतील, असा इशाराही आंबेडकर यांनी दिला. 

निर्णय न देणे, हे चुकीचेच 

आमदार अपात्रता प्रकरणी बोलताना कायद्याचे राज्य चालले पाहिजे. राहुल नार्वेकर हे निर्णय देत नसतील, तर ते चुकीचेच आहे, असे सांगत कोरेगाव भीमाप्रकरणी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची साक्ष होणेही महत्त्वाचे असल्याचे आंबेडकर यांनी नमूद केले. 

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love