‘चिडिया चुग गई खेत,अब पछताए का होय’ का आणि कोणाला म्हणाले असे नवाब मलिक

राजकारण
Spread the love

पुणे— राज्यात मविआचे सरकार स्थापन झाल्यापासून हे सरकार पडणार असे भाजपचे नेते सांगत होते. मात्र, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल आता आम्ही राज्यसरकार पाडणार नाही. हे सरकार पडल्यास आम्ही नवे सरकार देऊ अशी भूमिका मांडली आहे. त्यामुळे मविआ सरकार पडणार नाही हे ते आता स्वीकारत आहेत, असा टोला राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी लागवला. दरम्यान, दोन वर्षांपूर्वी अजित पवारांसोबत केलेल्या शपथविधीचा आपल्याला आता पश्चात्ताप होत असल्याची कबुली फडणवीस यांनी दिली आहे. फडणवीसांच्या या विधानाची ‘चिडिया चुग गई खेत, अब पछताए का होय’, अशा शब्दांत मलिक यांनी खिल्ली उडवली.

 त्यांना सत्तेशिवाय रहाताच येत नाही. त्यांनी हे दोन वर्षांपूर्वी सिद्ध करून दाखवले आहे. ते सांगत राहिले की अजून वाटत नाही की मी मुख्यमंत्री नाही. बहुतेक दोन वर्षांनंतर खरी परिस्धिती त्यांनी स्वीकारली आहे. त्यांचा सात वर्षांपूर्वीचा व्हिडीओ होता, ज्यात ते म्हणाले होते माझे लग्न कधीही होणार नाही, मी करणार नाही. पण ते देखील हे विसरून गेले. म्हणजे सत्तेवर येण्यासाठी ते काहीही करू शकतात, काहीही बोलू शकतात, असे नवाब मलिक म्हणाले.तसंच 2024 साली हे सरकार पुन्हा राज्यात सत्तेत येईल. मुख्यमंत्री महोदयांना विश्वास आहे की, हे सरकार केवळ पाच वर्षांसाठी नाही तर 25 वर्षांसाठी एकत्र आले आहे, असेही तेव म्हणाले.

आता देवेंद्र फडणवीसांचे भाजपमध्ये महत्त्व कमी होत असल्याची टीका नवाब मलिक यांनी केली. मला दिसत आहे की आता देवेंद्र फडणवीसांचे महत्त्व कमी होऊ लागले आहे. त्यांचे भाजपमधील अंतर्गत विरोधक असलेले विनोद तावडेंसारखे लोक मोठे होऊ लागले आहेत. त्यामुळे अंतर्गत राजकारण बदलत असल्याचे दिसत आहे. ज्यांना तिकीट नाकारण्यात आले, ते देशातील भाजपचे महासचिव झाले. दोन-तीन महत्त्वाच्या राज्यांची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. पंतप्रधानांकडे तावडेंना अॅक्सेस निर्माण झाला असल्याचे नवाब मलिक म्हणाले.

सरकारची ‘बाते कम, काम जादा’ अशी भूमिका

महाविकास आघाडी सरकारच्या प्रचार आणि प्रसिद्धीबाबत चर्चा सुरु आहे. मात्र सरकारची ‘बाते कम, काम जादा’ अशी भूमिका असल्याचे मलिक यांनी सांगितले.

सरकार सत्तेत आल्यावर सर्वप्रथम मागील सरकारच्या काळात प्रलंबित शेतकऱ्यांची कर्जमाफी मंजूर करून राज्यातील शेतकऱ्यांना सरकारने दिलासा दिला. सरकार सत्तेत आल्यानंतर दुर्दैवाने तीन महिन्यातच देशात कोरोनाचे संकट आले. मात्र यात देशभरात जी दुर्दैवी परिस्थिती आपण पाहिली तशी परिस्थिती राज्यसरकारने राज्यात निर्माण होऊ दिली नाही. यासाठी कोविड सेंटर्स, टेस्टींगमध्ये वाढ, ऑक्सिजनसाठा अशा सर्व गोष्टींचा पुरवठा राज्यसरकारने वेळोवेळी केल्याचे मलिक यांनी सांगितले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *