नवी दिल्ली –१३ जुलै २०२६ रोजी बलुचिस्तानने अधिकृतपणे स्वतःला एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून घोषित केले असून, यामुळे पाकिस्तानच्या अस्तित्वाला मोठा धक्का बसला आहे. ‘रिपब्लिक ऑफ बलुचिस्तान’ने जारी केलेल्या एका पत्राद्वारे आपली स्वातंत्र्य घोषणा करतानाच एका सार्वभौम राष्ट्रासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टींची अंमलबजावणी सुरू केली आहे. या नवीन राष्ट्राने ‘बलोची फालूस’ नावाचे स्वतःचे चलन जारी केले असून, संपूर्ण प्रदेशात आता बलुचिस्तानचा स्वतंत्र ध्वज डौलाने फडकताना दिसत आहे. इतकेच नव्हे तर, बलोच महिलांच्या ओठी असणारे ‘मां चुकैन बलोचानी’ हे गीत आता बलुचिस्तानचे अधिकृत राष्ट्रगीत म्हणून घोषित करण्यात आले आहे. सद्यस्थितीत बलुचिस्तानच्या तब्बल ८५ टक्के भूभागावर स्थानिक बलोच सैनिकांचे नियंत्रण असून, पाकिस्तानचे लष्कर केवळ काही मर्यादित भागांतच उरले आहे.
पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांच्यासाठी ही परिस्थिती अत्यंत नामुष्कीची ठरली आहे. बलुचिस्तानमध्ये लष्करी ऑपरेशन राबवण्यासाठी निघालेल्या मुनीर यांच्या फौजांची मोठी पिछेहाट झाली असून, बलोच स्वातंत्र्यसैनिकांनी पाकिस्तानच्या नकाशाचेच ऑपरेशन केल्याचे चित्र दिसत आहे. परिस्थिती इतकी गंभीर आहे की, पाकिस्तानी पोलीस आणि लष्कराचे जवान सक्तीने बलुचिस्तानमध्ये पाठवले जात असल्याने धडाधड राजीनामे देत आहेत. मैदानी स्तरावर पाहता, नौशकी सारख्या भागांत आता पाकिस्तानी पोलीस किंवा सैन्याचे नामोनिशाण उरलेले नाही आणि बलोच लिबरेशन आर्मी (BLA) चे जवान सरकारी वाहनांमधून खुलेआम गस्त घालत आहेत. लष्करी चौक्यांवर सैनिक बसण्याऐवी तिथे केवळ डमी बाहुले ठेवले जात आहेत, जेणेकरून दुरून तिथे सैनिक असल्याचा भास व्हावा, यावरून पाकिस्तानी सैन्यात पसरलेल्या दहशतीचा अंदाज येतो.
पाकिस्तानची सत्ता आता केवळ क्वेटा शहराच्या एका छोट्या तुकड्यापुरती मर्यादित राहिली असून, तिथले मुख्यमंत्री किंवा लष्करी अधिकारी हेलिकॉप्टरशिवाय बाहेर पडण्याची हिंमत करू शकत नाहीत. गेल्या ७८ वर्षांपासून बलुचिस्तानमधील सोने, तांबे आणि नैसर्गिक वायू यांसारख्या मौल्यवान साधनसंपत्तीची लूट पाकिस्तान आणि चीन मिळून करत आहेत, ज्याचा स्थानिक जनतेला कोणताही फायदा मिळालेला नाही. याच अन्यायाविरुद्ध आणि पाकिस्तानी पंजाबच्या वर्चस्वाविरुद्ध बलोच पुरुषांसोबतच महिलांनीही लष्करी गणवेश परिधान करून आणि हाती शस्त्रे घेऊन मोर्चे सांभाळले आहेत. नुकत्याच झालेल्या संघर्षात पाकिस्तानी लष्कराला एकाच आठवड्यात ४६ जवानांचे मृतदेह उचलावे लागले आहेत.
या सर्व अपयशाचे खापर फोडण्यासाठी पाकिस्तानी लष्कर आणि ‘डीजी आयएसपीआर’ (DG ISPR) भारताच्या विरोधात खोटा नॅरेटिव्ह चालवण्याचा प्रयत्न करत आहेत. भारताची गुप्तचर संस्था ‘रॉ’ (RAW) मुळेच हे सर्व घडत असल्याचा दावा लष्कराकडून केला जात आहे, मात्र पाकिस्तानी माध्यमांनीच लष्कराचा हा दावा खोडून काढला आहे. लष्कराने पत्रकारांना भारताच्या तुकड्यांच्या बातम्या चालवण्याचे आदेश दिले होते, परंतु जागतिक स्तरावर भारताची वाढती प्रगती पाहता हा प्रयत्नही अयशस्वी ठरला आहे. हा असंतोष केवळ बलुचिस्तानपुरता मर्यादित नसून पश्तून भागातही पसरला आहे, जिथे गेल्या काही दिवसांत ५० हून अधिक जणांना प्राण गमवावे लागले आहेत. बलोच स्वातंत्र्यसैनिकांनी या वर्षाच्या अखेरीस संपूर्ण प्रदेशातून पाकिस्तानी लष्कराला हुसकावून लावण्याचा निर्धार केला असून, त्यानंतर खैबर पख्तूनख्वाचा क्रमांक लागेल असे संकेत दिले आहेत. पाकिस्तानची एस्टॅब्लिशमेंट ज्या आगीशी खेळत आहे, त्याचे परिणाम आता देशाला विनाशाकडे घेऊन जात असल्याचे स्पष्ट दिसत आहे.















