अखेर अपहरण झालेला 4 वर्षीय डुग्गू आठ दिवसानंतर सुखरूप सापडला…..

पुणे- पुण्यातील बालेवाडी येथून भरदिवसा दुचाकीवरून अपहरण झालेला 4 वर्षीय डुग्गू आठ दिवसानंतर सुखरूप सापडला आहे. चिमुरड्याला अपहरणकर्ताच सोडून पसार झाला आहे. त्यानंतर तो सापडला आहे. स्वर्णव सतिश चव्हाण (वय ४ वर्षे) असे अपहरण झालेल्या या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. गेल्या आठवड्यात (दि. ११ जानेवारी) स्वर्णवचे अपहरण […]

Read More

भूमी अधीग्रहण कायद्याला विरोध करणारे शरद पवार आज कुठे आहेत ?- राजू शेट्टी

पुणे–केंद्र सरकारने २०१३ साली आणलेल्या भुमिअधिग्रहण कायद्यातील दुरुस्तीला विरोध असतानाही महाविकास आघाडीच्या सरकारने दोन अध्यादेशांद्वारे कायद्यात दुरुस्ती केली आहे. यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित नुकसानभरपाई मिळत नसून त्यांच्यावर अन्याय होत आहे. त्यामुळे आत्तापर्यंत किती शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित झाल्या तसेच किती शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळावा याची सरकारने श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी पत्रकार […]

Read More

ग्राहक आयोगाचा टाटा टेलि सर्विसेसला दणका : दीड लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश

पुणे—‘डू नॉट डिस्टर्ब’ सुरू असताना आणि वारंवार तक्रार करूनही सातत्याने नको असलेले फोन येऊन ग्राहकाला झालेल्या शारीरिक व मानसिक त्रास आणि आर्थिक नुकसानीपोटी दीड लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश ग्राहक आयोगाने टाटा टेलि सर्विसेस लिमिटेडला दिले आहेत. आयोगाचे अध्यक्ष उमेश जावळीकर, सदस्य क्षितीजा कुलकर्णी आणि संगीता यादव देशमुख यांनी हा निकाल दिला.अॅड. सिद्धार्थशंकर अमर शर्मा […]

Read More

तीर्थक्षेत्र देहूगाव नगरपंचायतीच्या पहिल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची बाजी : शिवसेना हद्दपार तर भाजपाला अवघी एक जागा

पुणे–मावळ लोकसभा मतदार संघातील निवडणुकीत २०१९ साली झालेल्या युवा नेते पार्थ पवार यांच्या पराभवाचा पहिला वचपा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार सुनील शेळके यांनी काढला. श्रीक्षेत्र देहूगाव नगरपंचायत निवडणुकीतून शिवसेना हद्दपार झाली, तर भाजपाला अवघ्या एका जागेवर समाधान मानावे लागले. त्यामुळे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे आणि भाजपाचे माजी मंत्री बाळा भेगडे यांना मोठा धक्का मानला जात […]

Read More

चाकणच्या जिल्हा परिषद शाळा नंबर 2 चे पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश

चाकण – चाकण येथील जिल्हा परिषद शाळा नंबर 2 ने पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 2021 मध्ये घवघवीत यश प्राप्त केले. यामध्ये दहा विद्यार्थिनी गुणवत्ताधारक ठरलेल्या आहेत. विद्यार्थिनीं, ईश्वरी थोरात ही २८४ गुण मिळवून शहरी राज्य गुणवत्ता यादीत ५वी व जिल्हा गुणवत्ता यादीत ३री आली आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका कमलताई खेडकर मॅडम आणि पालकांच्या उपस्थितीत गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थिनींचा […]

Read More

कुलगुरू निवडीवर राज्य शासनाचा होणारा हस्तक्षेप हा विद्यापीठांची स्वायत्तता कमी करणारा – भूषण पटवर्धन

पुणे— कुलगुरू निवडीवर राज्य शासनाचा होणारा हस्तक्षेप हा विद्यापीठांची स्वायत्तता कमी करणारा आहे व यामुळे राजकीय हेतूने झालेली कुलगुरूंची निवड ही भविष्यात शिक्षणाचा दर्जा घसरण्याच्या साठी कारणीभूत ठरू शकते असे मत यूजीसीचे माजी उपाध्यक्ष भूषण पटवर्धन यांनी व्यक्त केले. राज्य शासनाने केलेल्या विद्यापीठ कायदा बदलावर चर्चा करण्यासाठी विद्यार्थी निधी ट्रस्ट पुणे व सावित्रीबाई फुले पुणे […]

Read More