माझा नवरा वाघ होता आणि मी वाघीण आहे – स्वाती मोहोळ : नीतेश राणे यांनी घेतली शरद मोहोळ कुटुंबियांची भेट

My husband was a tiger and I am a tigress
My husband was a tiger and I am a tigress

Nitesh Rane –मोहोळ कुटुंबीयांचे (Mohol Family) हिंदु(Hindu) समाजासाठी मोठं काम असल्याचं सांगत भाजपा नेते नितेश राणे(Nitesh Rane) यांनी, “शरद मोहोळ(Sharad Mohol) यांची जी प्रतिमा दाखवली जाते ती चुकीची असल्याचे पुण्यात प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. शरद मोहोळ गुन्हेगारी क्षेत्रात का आले? याची कुणाला माहिती नाही, त्यामुळे त्यांची अशी प्रतिमी केली जात आहे. ती तशी करू नये अशी विनंती मी करतो,” असेही नितेश राणे(Nitesh Rane) म्हणाले.  

राणे यांनी सोमवारी मोहोळ कुटुंबियांची भेट घेतली. त्यांनी पत्नी स्वाती मोहोळ यांचे सांत्वन केले. त्यानंतर ते म्हणाले, “आज कोणतीही राजकीय किंवा अन्य चर्चा न करता मोहोळ कुटुंबीयांचे सांत्वन करायला आलो आहे. मोहोळ यांनी हिंदुत्वासाठी(Hinduism) काम केले. सामान्यांच्या अडचणी सोडवल्या. या कुटुंबियांच्या पाठिशी उभे राहणे, हे आमचे काम आहे. कुठलाही प्रश्न निर्माण झाला की मोहोळ कुटुंब कार्यकर्त्यांच्या मागे उभे राहिले आहे. या संकटाच्या काळात वहिनींबरोबर उभं राहाणं माझी नैतिक जबाबदारी आहे. हिंदू म्हणून माझी ती जबाबदारी आहे. आज आधार देण्यासाठी मी आलो आहे.  शरद मोहोळ यांच्या जाण्याने हिंदुत्ववादी (Hinduism) कार्यकर्त्यांनी खचून न जाता काम करावं. पोलीस या प्रकरणाचा योग्य तो तपास करत आहेत.”

अधिक वाचा  संतूरची तार निखळली : पंडित शिवकुमार शर्मा यांचे निधन : केवळ 500 रुपये घेऊन आले होते मुंबईत

हिंदुत्वाचे काम करणाऱया कार्यकर्त्यांनी कुठेही खचून जाता कामा नये. आम्ही सगळेजण परिवार म्हणून त्यांच्याबरोबर आहोत. पोलिस योग्य तो तपास करत आहे. या तपासामध्ये टप्प्याटप्प्यात काय होतं, ते येणाऱया काळात कळेलच. रात्री-बेरात्री कुठेही हिंदू समाजावर संकट आले तर ताई आणि त्यांचे पती उभे राहिलेले आहेत. या संकटाच्या काळात आम्ही त्यांच्यासोबत आहोत, अशी ग्वाही राणे यांनी यावेळी दिली.

शरद मोहोळ यांची जी प्रतिमा (Sharad MOhol Image) दाखवली जाते ती चुकीची आहे, त्या बद्दल मोहोळ कुटुंबीयांनी नाराजी व्यक्त केली. शरद मोहोळ गुन्हेगारी क्षेत्रात का आले याची कुणाला माहिती नाही, त्यामुळे त्यांची अशी प्रतिमी केली जात आहे. ती तशी करू नये अशी विनंती मी करतो, असेही राणे म्हणाले.

अधिक वाचा  #SSC Exam Hall Ticket : दहावीच्या परीक्षेचे प्रवेशपत्र उद्यापासून(दि.३१ जानेवारी) ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध होणार

माझा नवरा हा वाघ होता आणि मी वाघीण आहे

शरद मोहोळ यांच्या पत्नी स्वाती मोहोळ(Swati Mohol) यांनीही यावेळी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या की, “सरकार(Govt.) आणि प्रशासनावर(Administration) आपला पूर्ण विश्वास आहे. कायदा आपल्याला न्याय देईल. आपला नवरा हिंदुत्ववादी होता, हिदुत्ववादासाठी काम करत होता म्हणून त्याची हत्या झाली. समोरच्याला जर असं वाटत असेल की अशा घटनेमुळे मी खचून जाणार तर त्यांना मला एकच सांगायचं आहे, मी हिंदुत्ववाद्याची बायको आहे. माझा नवरा हा वाघ होता आणि मी वाघीण आहे. ( My husband was a tiger and I am a tigress) शेवटचा श्वास असेपर्यंत मी हिंदुत्वासाठी काम करणार.

स्वाती मोहोळ या भाजपच्या पुणे शहर महिला आघाडीच्या सरचिटणीस आहेत. स्वाती मोहोळ (Swati Mohol) यांनी राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrkant Patil) यांच्या उपस्थितीत एप्रिल २०२३ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. स्वाती मोहोळ यांच्या भाजप पक्ष प्रवेशानंतर शरद मोहोळ(Sharad मोहोळ)राजकारणात प्रवेश करणार अशीही चर्चा होती. पण त्या आधीच त्याची हत्या करण्यात आली.

अधिक वाचा  एमआयटी एडीटी विद्यापीठात आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love