पालखी सोहळ्यानिमित्त पवार कुटुंबांतील राजकीय नेत्यांचा एकत्रित बॅनर बारामतीमध्ये झळकला

On the occasion of the Palkhi ceremony, the combined banner of political leaders of the Pawar family was displayed in Baramati
On the occasion of the Palkhi ceremony, the combined banner of political leaders of the Pawar family was displayed in Baramati

पुणे(प्रतिनिधि)–पवार कुटुंबात राजकीय फूट पडल्यानंतर बारामती मधील स्थानिक राजकारण बदललं आहे. मात्र, पंढरपूरच्या वारीच्या पालखी सोहळ्यानिमित्त पवार कुटुंबांतील राजकीय नेत्यांचा एकत्रित बॅनर बारामतीमध्ये झळकला आहे. सध्या सोशल मीडियासह बारामतीमध्ये या बॅनरची चांगलीच चर्चा आहे.  राजकारणाच्या दृष्टीने बारामती दोन गटात विभागली असली तरी बारामतीकरांसाठी मात्र सारे एकच असल्यासारखे आहेत. बारामतीमध्ये झळलेल्या बॅनरवरुन असाच काहीसा संदेश देण्यात आला आहे.

तुकोबारायांच्या पालखी सोहळ्याच्या स्वागताच्या निमित्ताने बारामती शहरात हा फलक उभा करण्यात आला आहे. राजकारण्यांच्या पंढरीत तुमचे स्वागत असा आशय या फलकावर आहे. वारकऱ्यांचे स्वागत करताना या फलकावर सर्वच पवार कुटुंबाचे फोटो एकत्रितपणे झळकले आहेत. त्यामध्ये, शरद पवार, अजित पवार आणि रोहित पवार यांच्या फोटोची एक लाईन, तर सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार यांच्या फोटोची एक लाईन दिसून येत आहे. त्यासोबतच, सर्वात वरती बा विठ्ठलाचा फोटो दिसून येत आहे. ८ नं. बॉयज… ने हा बॅनर उभारला असून ‘ना सन्मान का मोह, ना अपमान का भय’.. असेही वाक्य बॅनरवर दिसून येत आहे.

अधिक वाचा  कोणता पक्ष... कोणता विचार.. अन् कसली निष्ठा..इथं पसरलीय बरबटलेल्या राजकारणाची विष्ठा.. : रोहित पवार यांचे ट्वीट

सध्या देशाच्या आणि राज्याच्या राजकारणातील परिस्थिती बदलली असून पवार कुटुंबात दोन गट पडले आहेत. त्यामुळे, शरद पवार विरुद्ध अजित पवार असा राजकीय सामना आहे. मात्र, या फोटोच्या निमित्ताने पुन्हा एकदा पवार कुटुंब एकत्र आले, असे म्हटले तर वावगं ठरणर नाही. दरम्यान, सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार बारामतीत पालखी विसावल्यावर समाज आरतीसाठी एकत्र येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love