कुणी काही बोलले म्हणून मी ‘अरेला कारे’ करणार नाही- सुप्रिया सुळे

नीरा देवधर योजना रद्द करण्याचा निर्णय अन्यायकारक
नीरा देवधर योजना रद्द करण्याचा निर्णय अन्यायकारक

Supriya Sule — ज्येष्ठ नेते शरद पवार(Sharad Pawar) हे ८४ व्या वर्षीही राजकारणात जिद्दीने लढत आहेत, याबाबत सर्वांना अभिमान असला पाहिजे. शरद पवार यांची राजकीय कारकीर्द ( Political career) मोठी असून ती जनतेने पाहिली आहे. आपल्यापेक्षा मोठय़ा माणसावर मी बोलत नाही, तसे संस्कार माझ्यावर नाहीत. शांत बसून सहन करण्यास अधिक ताकद लागते. त्यामुळे कुणी काही बोलले म्हणून मी ‘अरेला कारे’ करणार नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे(Supriya Sule) यांनी अजित पवार(Ajit Pawar) यांच्या शरद पवारांविषयीच्या (Sharad Pawar) टीकेला सोमवारी उत्तर दिले. 

पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सुळे बोलत होत्या. त्या म्हणाल्या, आम्ही यशवंतराव चव्हाण यांच्या संस्कारात मोठे झालो आहोत. खरे तर आता अजितदादाही ज्येष्ठ नागरिक श्रेणीमध्ये मोडतात. त्यांचे वय ६५ आहे. त्यांच्या वयाच्या मानाने आमदार रोहित पवार हे बच्चा असू शकतात. दादा हे काकाचा अधिकाराने त्याला तसे म्हणाले असतील. रोहितच्या वयात शरद पवार हे मुख्यमंत्री होते. माझ्यापेक्षा दादा दहा वर्षांनी मोठे आहेत. हे सगळे लक्षात घेतले पाहिजे. पवारसाहेब या वयातही लढत आहेत, हे अधिक महत्त्वाचे आहे. 

अधिक वाचा  जागतिक महिला दिनानिमित्त विशेष लेखमाला-  ‘मुलखावेगळी ती’:संवेदनशील मृदुलाताई 

सुळे म्हणाल्या, पुणे मनपा आयुक्त यांना मी महिन्यातून एकदा भेटत असते. कारण माझ्या मतदारसंघातील काही भाग पुण्यात असून नागरिकांचे प्रश्न मांडावे लागतात. लोकप्रतिनिधी नसल्याने नागरिकांचे प्रश्न दुर्देवाने सुटत नाहीत. मागचे अनेक महिने न्यायालयात केस दाखल आहे, पण सत्ताधारी निवडणूक घेण्यास उत्सुक नाहीत. त्यामुळे विकासकामात अडचणी निर्माण होत आहेत. पाणी, कचरा, रस्ते, वाहतूक समस्या यामुळे नागरिक त्रस्त आहेत. जनतेला कुणी वाली उरलेला नाही, असे सांगत ‘शासन आपल्या दारी’मधील दाखले हे स्थानिक पातळीवर दिले जाऊ शकतात. मुख्यमंत्र्यांनी त्यांचा महत्त्वपूर्ण वेळ वाया न घालवता तसेच या उपक्रमात पैसे नाहक खर्च घालण्यापेक्षा चांगल्या ठिकाणी खर्च करावेत. महविकास आघाडी काळात कोविडमध्ये आम्ही कोणाला काही कमी पडू दिले नाही. जलजीवन मिशन आढावा घेतला असता अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून आल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. मीही रोज 16 तास काम करते, असे उत्तरही त्यांनी दादांच्या विधानावर बोलताना दिले. 

अधिक वाचा  पुण्यात कोरोनाची भयावह स्थिती: खाटांची कमतरता आणि मृत्युदरात वाढ होणार?

 यंदा पाण्याची स्थिती गंभीर 

यंदा पाऊस खूपच कमी पडला. त्यामुळे पाण्याचा प्रश्न केवळ पुण्यातच नव्हे, तर सर्वत्र बिकट आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे आपण तातडीने उपाय करण्याची व स्वतंत्र बैठक घेण्याची मागणी आपण केली आहे. अनेक धरणांतील पाणी साठा कमी होऊ लागला आहे. शहरांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. आत्ताच ही स्थिती असेल, तर ऐन उन्हाळय़ात काय होईल, याचा विचार करावा, असेही त्यांनी सांगितले. 

 भजन स्पर्धेचे आयोजन

 दरम्यान, यशवंतराव चव्हाण सेंटर आयोजित जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज अभंग आणि भजन स्पर्धेची माहिती देताना रघुनाथ खंडाळकर म्हणाले, आठ विभागातून ही स्पर्धा होणार आहे. एक संतांचा अभंग आणि दुसरी ‘पाणी वाचवा’ या विषयावरची रचना, अशी ही स्पर्धा होईल. प्रत्येक विभागातील दोन मंडळे निवडून अंतिम १६  संघांची स्पर्धा बारामती येथे होणार आहे. या स्पर्धेत पहिले बक्षीस एक लाख, दुसरे ७५  हजार, तर तिसरे ५१ हजाराचे बक्षीस असेल. 

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love