gtag('js', new Date());
Wednesday, November 30, 2022

राजकारण

राज ठाकरे आत्मनिरीक्षण करा अन्यथा..’लोका सांगे ब्रम्हज्ञान’… असे व्हायला नको -गोपाळदादा तिवारी

पुणे– खालच्या पातळींवरील राजकारणावर आसुड ओढणाऱ्या राज ठाकरेंनी दुसऱ्या नेत्यांबद्दल बोलताना आपण स्वतः कोणत्या पातळींवर आहोत याचे देखील आत्मपरीक्षण करावे. अन्यथा “लोका सांगे ब्रम्हज्ञान… असेच  म्हणावे लागेल असा टोला कॉँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी राज ठाकरेंना लगावला आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी रविवारी मुंबईतील मनसे गटाध्यक्षांच्या मेळाव्यात स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्यासदर्भात केलेल्या […]

शुभश्री दिवाळी अंक २०२२

https://news24pune.com/shubhshree-divali-2022/

राष्ट्रीय

राजस्थानच्या आणि कॉँग्रेसच्या राजकारणातील घमासान : कसा वाढला गेहलोत आणि पायलट यांच्यातील वाद ?

नवी दिल्ली -राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी काँग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्यांच्या जागेवर नवा मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा सुरू झाली. सुरुवातीला गेहलोत या दोन्ही पदांवर कायम राहू शकतात अशी  शक्यता व्यक्त केली जात असतानाच नंतर त्यांनी नकार दिला. त्याला कारण होते सध्या ‘भारत जोडो’ यात्रा करीत असलेले राहुल गांधी. त्यांनी उदयपूर येथील काँग्रेस […]

समस्त काँग्रेस जनांनी ‘व्यापक देश हितासाठी’ एकजुटीने ‘भारत जोडो’यात्रेत सहभागी होणे, काळाची गरज – गोपाळदादा तिवारी

पुणे-  देशाच्या सार्वभौम व व्यापक हितासाठी, सामाजिक सलोखा व सदभावनेच्या वाढीसाठी, लोकशाहीच्या बळकटीसाठी “देशातील समस्त काँग्रेस जनांनी अर्थातच् पक्षांतर्गत मत-मतांतरे असणारे नेतेगण, समर्थक इ.नी भाजपच्या ‘देश विघातक’ राजकारण विरोधी सर्वांनीच, कोणताही गट-तट न ठेवता, मा. राहूलजी गांधींच्या नेतृत्वाखालील, सर्वपक्षीय ‘भारत जोडो’ यात्रेत शक्य तेथे किमान अवधीत सहभागी होऊन, विद्यमान सरकार विरोधी ऐक्याचा संदेश देणे, ही […]

आंतरराष्ट्रीय

नॅशनल जिओग्राफिक वाहिनी वरील ‘वन फॉर चेंज’ मालिकेत घेतल्या गेली पुण्यातील प्रियदर्शन सहस्रबुद्धे यांच्या कार्याची दखल

पुणे–ओला कचऱ्याने आपली सोसायटी, परिसर इतकेच काय पण आपले संपूर्ण शहर विद्रुप होते. मात्र, याच ओल्या कचऱ्यातून तरुणांच्या हाताला रोजगार मिळाला, त्यातून इंधन मिळाले तर, कचऱ्याची समस्या सुटेलच पण या समस्येकडे संधी म्हणून पहाता येईल, असा विश्वास पुण्यातील प्रियदर्शन सहस्त्रबुद्धे यांनी ‘वायू’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पातून दाखवून दिले आहे. त्यांचा या प्रकल्पाची दखल नॅशनल जिओग्राफिक चॅनेलवरील […]

इलॉन मस्क बनले ट्विटरचे नवे बॉस, 44 अब्ज डॉलरचा झाला करार

नवी दिल्ली : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले टेस्ला प्रमुख एलोन मस्क यांनी अखेर ट्विटर विकत घेतले आहे (Tesla chief Elon Musk has finally bought Twitter). या कराराची माहिती कंपनीकडून देण्यात आली. कंपनीने सांगितले की, हा करार 44 अब्ज अमेरिकन डॉलर्स म्हणजेच सुमारे 3368 अब्ज रुपयांमध्ये झाला आहे. लोकप्रिय सोशल नेटवर्किंग साइट ट्विटर विकत […]

पुणे-मुंबई

जेष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोतापल्ले यांचे निधन

पुणे- जेष्ठ साहित्यिक, चिपळूण येथे झालेल्या ८६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ.नागनाथ कोतापल्ले यांचे बुधवारी (दि.३० नोव्हेंबर) दु:खद निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते. त्यांच्यामागे पत्नी डॉ.विजया कोतापल्ले, मुलगा सायन पब्लिकेशन्सचे संचालक नितीन कोतापल्ले, सून, आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर आज रात्री साडेआठ वाजता पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील. डॉ. […]

Most Favourite

क्राईम

ऑनलाइन सेक्सट्रॉर्शनचे राजस्थान कनेक्शन : एकाच गावातील २५०० लोक सेक्स्टॉर्शन रॅकेटमध्ये

पुणे–ऑनलाइन सेक्सट्रॉर्शन करून खंडणी मागीतल्यामुळे पुण्यातील दोघांनी आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. याप्रकरणी पोलिसांनी तपास केल्यानंतर त्याचे धागेदोरे राजस्थानपर्यंत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी मुख्य सुत्रधाराच्या राजस्थानमध्ये जाऊन मुसक्या आवळल्या आहेत. दरम्यान, या आरोपीला अटक करत असताना स्थानिक ग्रामस्थांनी पोलिस पथकावर हल्ला केला. विशेष धक्कादायक बाब म्हणजे गुरुगोठडी या गावातील स्त्री-पुरुष मिळून जवळपास […]

क्रीडा

हॉकी स्पर्धांच्या आयोजनात कोट्यवधींचा गैरप्रकार? : निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशीची रणवीर सिंग यांची मागणी

पिंपरी- पिंपरी-चिंचवड महापालिका आणि हॉकी महाराष्ट्र यांच्या वतीने गेल्या वर्षीच्या अखेरीस  आयोजित करण्यात आलेल्या जिल्हा आणि राष्ट्रीय हॉकी स्पर्धांच्या वेळी हॉकी महाराष्ट्र संघटनेच्या घटनेमध्ये ज्या पदांची तरतूद नाही, त्या पदांची नियमबाह्य पध्दतीने नियुक्ती करून जिल्हा आणि राष्ट्रीय हॉकी स्पर्धेसाठी कोट्यवधी रुपयांचे प्रायोजकत्व घेतले गेले आणि  महापालिका आयुक्त राजेश पाटील, तत्कालीन पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश आणि […]

सौ.प्रमोदिनी अमृतवाड यांनी आपल्या कार्य कर्तुत्वाने लौकिक मिळविला- आमदार डॉ. सुधीर तांबे

पुणे- क्रीडा क्षेत्रासारख्या महत्वाच्या क्षेत्रामध्ये एक उत्तम प्रशासक म्हणून आपल्या कार्य कर्तुत्वाने लौकिक मिळवतानाच एक उत्तम गृहिणी, उत्तम पत्नी, उत्तम आई, उत्तम सून म्हणूनही आपली सर्व कर्तव्ये राज्याच्या क्रिडा व युवक सेवा संचालनालयाच्या सेवानिवृत्त उपसंचालिका सौ.प्रमोदिनी अरुण अमृतवाड यांनी पार पाडली असे गौरोद्गार नाशिक पदविधर मतदार संघाचे आमदार डॉ.सुधीर तांबे यांनी काढले. सौ.प्रमोदिनी अरुण अमृतवाड […]

शिक्षण

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीचा निकाल जाहीर:खुला प्रवर्ग वगळता अन्य पाच प्रवर्गाचे निकाल आतापर्यंत जाहीर

पुणे– सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेचे पाच प्रवर्गातील निकाल मंगळवारी जाहीर सायंकाळी जाहीर करण्यात आले, दरम्यान खुल्या प्रवर्गातील दुसऱ्या फेरीची मतमोजणी रात्री उशिरापर्यंत सुरू राहणार आहे. अनुसूचित जाती प्रवर्गातून राहुल पाखरे १३ हजार ५१२ मतांनी निवडून आले. अनुसूचित जमाती प्रवर्गातून १३ हजार ९९५ मते मिळवत गणेश नांगरे निवडून आले. निरधिसूचित जमाती (विमुक्त जाती) भटक्या जमाती […]

तंत्रज्ञान

टॅलेंट स्प्रिंटने गुगलच्या सहकार्याने केली महिला अभियंता कार्यक्रमाची घोषणा

पुणे: टॅलेंट स्प्रिंट, एक ग्लोबल एडटेक कंपनी आणि ट्रान्सफॉर्मेशनल डीपटेक  कार्यक्रमात आघाडीवर असलेल्या कंपनीने आज तिच्या महिला अभियंता कार्यक्रमाच्या चौथ्या आवृत्तीची घोषणा केली आहे . संपूर्ण तंत्रज्ञान स्पेक्ट्रमवर केंद्रित उपक्रमांद्वारे महिलांना गुंतवून ठेवण्याच्या, सक्षम करण्याच्या आणि सक्षम करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेनुसार सुरू केलेल्या या कार्यक्रमाला गुगलचे पाठबळ मिळेलेले आहे. विविध सामाजिक-आर्थिक पार्श्वभूमीतील उद्योजक आणि महत्त्वाकांक्षी महिला […]

आयआयटी जेईई आणि नीट ऑनलाईन अभ्याक्रम टाटा स्कायवर उपलब्ध

पुणे  :  टाटा स्काय या भारतातील कंटेंट डिस्ट्रिब्युशन आणि पे टीव्ही व्यासपीठाने वेदांतू या लाईव्ह ऑनलाइन लर्निंगमधील संस्थेच्या साह्याने आज एका नाविन्यपूर्ण भागीदारीची घोषणा केली आहे. यातून भारतभरातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून दिले जाणार आहे .खर्च, अंतर आणि वेळ अशा शिक्षण घेण्यातील सर्वसाधारण अडचणी दूर करत या व्यासपीठावर टाटा स्काय जेईई प्रेप […]

आरोग्य

मल्टी-स्पेशालिटी आरोग्य-तंत्रज्ञान स्टार्टअप फर्स्टक्यूअर हेल्थचा पुण्यात विस्तार

पुणे- नोईडामधील आरोग्य-तंत्रज्ञान क्षेत्रातील स्टार्टअप कंपनी फर्स्टक्यूअर हेल्थ आता पुण्यातील आपला विस्तार वाढवत आहे. ही अनोखी स्टार्टअप कंपनी योग्य खर्चात योग्य डॉक्टर आणि योग्य उपचार उपलब्ध करून, देऊन रुग्णांना मदत करते. तसेच हे स्टार्टअप रुग्णांच्या साहित्यसामुग्रीचा पुरवठा आणि कागदपत्रांची संपूर्ण प्रक्रियासुद्धा हाताळते .मोठ्या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असलेल्या अत्याधुनिक पद्धतीच्या निवडक शस्त्रक्रिया   त्या हॉस्पिटलशिवाय अन्यत्रही कमी किमतीत […]

मनोरंजन

जेष्ठ अभिनेते अमोल पालेकर रुग्णालयात

पुणे–सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते अमोल पालेकर यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ७७ वर्षीय अभिनेत्याला पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अभिनेत्याच्या आजारपणाची बातमी समजताच चाहत्यांनी त्यांना लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. अमोलची पत्नी संध्या गोखले यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. अमोल पालेकर यांना झालेल्या एका […]

अर्थ

श्माल्झ इंडियाच्या दुसऱ्या नवीन उत्पादन युनिटचे उद्घाटन

पुणे: भारतातील आपल्या व्यवसायाचा विस्तरा करण्याचा दृष्टिकोन बाळगत श्माल्झ इंडिया प्रा. लिमिटेडने आज पुण्यातील आपले दुसऱ्या नवीन उत्पादन युनिटचे उद्घाटन फेडरल रिपब्लिक ऑफ जर्मनीचे उप महावाणिज्यदूत, मुंबईच्या मार्जा एनिग यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी अँड्रियास ब्यूटेल (व्यवस्थापकीय संचालक – जे. श्माल्झ जीएमबीएच), फिलिप जे. मणी (व्यवस्थापकीय संचालक – श्माल्झ इंडिया),  वोल्कर ब्रुक (प्रोजेक्ट हेड इंटरनॅशनल […]

करिअर-नोकरी-व्यवसाय

लेख

सामाजिक समरसतेसाठी वरदान : सवर्ण आरक्षण

गरिबीपेक्षा मोठा शाप नाही असे म्हणतात. गरीबी ना जात पाहते, ना धर्म मागासलेपणाच्या मुळाशीही गरिबी आहे. केंद्राच्या पुरोगामी आणि संवेदनशील सरकारने समाजाचे हे सत्य ओळखले आणि 2019 मध्ये घटना दुरुस्ती विधेयक आणून देशातील गरीब उच्चवर्णीय आरक्षणाचा मार्ग मोकळा केला, ज्यामुळे मागासलेल्या उच्च जातींना सामाजिक न्यायाचा आधार मिळेल. हा निर्णय आर्थिक समतेच्या दिशेने टाकलेले तसेच जातीय […]

पूजा वनदुर्गांची : सावरपाडा एक्स्प्रेस – कविता राऊत

नवरात्री म्हणजे निसर्गाशी एकरूप होऊन आनंदोत्सव करण्याचा सोहळा. नवरात्राला ऊर्जा, शक्ती, कर्तृत्व, शौर्य, पराक्रमाची परंपरा आहे. नवरात्र म्हणजे आसुरी विचारसरणीवर विजय मिळविण्याचे दिवस. नवरात्रात कात्यायिनी, शैलपुत्री, सरस्वती किंवा महादुर्गा अशा विविध रुपांमध्ये देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. आपण आपल्या देशालाही भारतमातेच्या म्हणजेच देवीच्या रूपात पाहतो. मात्र समाजात दुर्लक्षित राहिलेल्या, न्यूनगंडामुळे पुढे न आलेल्या, रानावनात […]

पूजा वनदुर्गांची : अन्नमाता ममताबाई भांगरे

नवरात्री म्हणजे निसर्गाशी एकरूप होऊन आनंदोत्सव करण्याचा सोहळा. नवरात्राला ऊर्जा, शक्ती, कर्तृत्व, शौर्य, पराक्रमाची परंपरा आहे. नवरात्र म्हणजे आसुरी विचारसरणीवर विजय मिळविण्याचे दिवस. नवरात्रात कात्यायिनी, शैलपुत्री, सरस्वती किंवा महादुर्गा अशा विविध रुपांमध्ये देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. आपण आपल्या देशालाही भारतमातेच्या म्हणजेच देवीच्या रूपात पाहतो. मात्र समाजात दुर्लक्षित राहिलेल्या, न्यूनगंडामुळे पुढे न आलेल्या, रानावनात […]

Follow Us On

Amazon Sell

Visit Our Youtube Chaneel News24Pune

Best Laptop For Students