हर्षवर्धन पाटील आणि दत्ता भरणे यांच्यात रंगले ‘बॅनर वॉर’ : हर्षवर्धन पाटील अपक्ष लढणार?

'Banner War' between Harshvardhan Patil and Dutta Bharne
'Banner War' between Harshvardhan Patil and Dutta Bharne

पुणे(प्रतिनिधि)—पुणे जिल्ह्यातील इंदापूर विधानसभा मतदार संघांमध्ये राष्ट्रवादी कॉँग्रेस अजित पवार गटाचे विद्यमान आमदार दत्ता भरणे आणि भाजपचे नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यामध्ये ‘बॅनर वॉर’ रंगले आहे. हर्षवर्धन पाटील यांनी महायूतीकडून इंदापूर विधानसभा लढवण्यासाठी यापूर्वीच दावा केला आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी तसे सुतोवाचही केले आहे. दरम्यान, विद्यमान आमदार दत्ता भरणे यांनीही दावा केल्याने या जागेचा तिढा सोडवण्याची डोकेदुखी महायुतीच्या नेत्यांना होणार आहे.

आमचं आता ठरलं, लागा तयारीला’   

विधान परिषदेवर वर्णी लागेल अशी अपेक्षा हर्षवर्धन पाटील यांना होती. पण त्यांना पक्षाने संधी दिली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा त्यंनी आपल्या पारंपारीक इंदापूर विधानसभेव लक्ष केंद्रीत केले आहे. पाटील यांचे कार्यकर्तेही जोरात आहेत. महायुतीत ही जागा कोणाच्या वाट्याला जाणार हे अजूनही निश्चित नाही. त्या आधीच हर्षवर्धन पाटील यांचे कार्यकर्ते हे कामाला लागले आहे. त्यांनी इंदापूरमध्ये जोरदार बॅनरबाजी केली आहे. हर्षवर्धन पाटील यांच्या समर्थनार्थ इंदापूरात “आमचा स्वाभिमान आमचे विमान.. “आमचं आता ठरलयं, लागा तयारीला विधानसभा 2024” अशा आशयाचे बॅनर जागोजागी लावले आहेत. त्यातून पाटील यांनी वातावरण निर्मिती करण्यास सुरूवात केली आहे. शिवाय पक्षाने उमेदवारी दिलीच नाही तर अपक्ष लढण्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत. 

अधिक वाचा  Drug mafia Lalit Patil case : ससून रुग्णालयाचे तत्कालीन अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांना अटक होणार?

आमचं ठरत नसतं तर आमचं फिक्स असतं’

हर्षवर्धन पाटलांच्या या बॅनरबाजीला उत्तर देत दत्त भरणे यांच्या कार्यकर्त्यांनीही इंदापूरात बॅनर झळकवले आहेत. विशेष म्हणजे हर्षवर्धन पाटील यांच्या बॅनर शेजारीच दत्ता मामांचे बॅनर लावण्यात आले. “विकासाची परंपरा कायम राखुया, चला विजयाची हॅट्रीक पूर्ण करुया. शिवाय ‘आमचं ठरत नसतं, तर आमचं फिक्स असतं’ असं प्रत्युत्तरही भरणेंच्या समर्थकांनी बॅनरच्या माध्यमातून दिलं आहे.

हर्षवर्धन पाटील अपक्ष लढणार?

२०१९ साली हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेस सोडण्याचं कारणचं होतं ते म्हणजे इंदापूरची विधानसभेची जागा.२०१९  ला भले आघाडी तुटली तरी बेहत्तर पण इंदापूरची जागा सोडणार नाही, अशी गर्जनाच अजित पवारांनी केली होती. आता  अजित पवार भाजपसोबत सरकारमध्ये सहभागी झाल्याने इंदापूरच्या जागेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पुन्हा इंदापूरच्या जागेवर अजित पवार अडून बसतील आणि सत्ताधारी आमदार म्हणून इंदापूरची जागा दत्तात्रय भरणे यांना सुटेल असे संकेत कार्यकर्त्यांना मिळू लागल्याने पाटील यांनी आतापासूनच अपक्ष म्हणून लढण्याची तयारी सुरु केल्याचं दिसून येत आहे. तसे संकेतही त्यांच्या बॅनरवरून दिसून येत आहेत. कारण त्यांच्या बॅनरवर ‘आमचा स्वाभिमान.. आमचे विमान’ असे म्हटले असून विमानाचे चित्र आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love