अखेर नाथाभाऊंचा भाजपला रामराम : राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची जयंत पाटील यांची घोषणा


मुंबई- नाही- हो, आज नाही वेळ आल्यावर सांगतो असे म्हणत गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश लांबणीवर पडलेल्या  भाजपचे नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादीमधील प्रवेशावर अखेर आज शिक्कामोर्तब झाले आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुंबईमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा केली . शुक्रवारी दुपारी दोन वाजता ते राष्ट्रावादीत प्रवेश करणार असल्याचे सांगितले.

गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे नाराज आहेत. त्यांनी त्यांची नाराजी अनेकवेळा जाहीरपणे बोलून दाखवली होती. त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीमध्ये त्यांच्या प्रवेशाची चर्चा सुरू होती. घटस्थापनेचा मुहूर्तावर ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगलेली असताना त्या दिवशी त्यांच्या प्रवेशाचा बार फुसका निघाला. त्यानंतर पुन्हा एकनाथ खंडसे आपल्या मुलीसह राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. शुक्रवारी म्हणजे 23 तारखेला ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे वृत्तही काही वाहिन्यांनी दिले होते. तसेच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोदींच्या कालच्या दिलेल्या देशाला केलेल्या संदेशाच्या भाषणावर केलेल्या टीकेचे ट्वीट खडसे यांनी ट्वीरीट  केले होते.त्यावेळीच त्याचे राष्ट्रावडीच्या प्रवेशाच्या बाबतीत शिक्कामोर्तब झाले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love
अधिक वाचा  धंगेकरांचे टेन्शन वाढलं; पुण्यात ठाकरे गट काम करणार नाही?