फडणविसांनी मला खूप छळलं -पक्षत्याग केल्यानंतर खडसेंची प्रतिक्रिया

राजकारण
Spread the love

जळगाव –अनेक दिवसांपासून नाराज असलेले भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम केल्यानंतर पहिली प्रतिक्रिएकनाथ या देताना विरोधी पक्षनेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला असून केवळ त्यांच्यामुळेच पक्षत्याग केल्याचे जळगाव येथे पत्रकारांशी बोलताना म्हटले आहे. गेल्या 40 वर्षांत भाजप जिथे नाही त्याठिकाणी पोहचवला. परंतु, देवेंद्र फडणवीस यांनी मला खूप छळल, माझ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असा आरोप करत पक्ष सोडताना खूप खंत वाटत असल्याचे ते म्हणाले.

मुंबईमध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत एकनाथ खंडसे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाची घोषणा केल्यानंतर खंडसे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. यावेळी ते भावुकही झाले होते. मी पक्षावर किंवा केंद्रातील नेत्यांवर कधीही टीका केली नाही. गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन,पांडुरंग फुंडकर, अशा पक्षाच्या दिग्गज नेत्यानबरोबर काम केले. परंतु, छळाला मर्यादा असतात. माझ्यावर मंत्री असताना विरोधी पक्षातील कोंग्रेस, राष्ट्रवादी किंवा तत्कालीन मित्रपक्ष शिवसेनेने माझ्या चौकशीची मागणी केली नाही. तरीही माझ्या राजीनामा घेतला. एसीबी चौकशी, भूखंड प्रकरण, दमानिया यांनी विनयभंगाचा खोटा खटलाही दाखल केला, पोलिसांच्या नकारानंतरही देवेंद्रजींनी सांगितल्याने खटला नोंदवला असा आरोप त्यांनी केला.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *