मंत्री नवाब मलिकांचे जावई समीर खान यांच्या अटकेने राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडी सरकारच्या अडचणी वाढल्या


मुंबई : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या विवाहबाह्य संबंधाचे प्रकरण समोर आल्याने आणि त्यांच्यावरील आरोपाने अडचणीत सापडलेल्या राष्ट्रवादी कॉँग्रेसची आणि महाविकास आघाडी सरकारची आता आणखी एका प्रकरणामुळे गोची झाली आहे.राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि  राष्ट्रवादी कॉँग्रेसचे  प्रवक्ते नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना ड्रग्ज प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) दहा तासांच्या चौकशीनंतर अटक केल्याने खळबळ उडाली आहे.

नवाब माळीक यांची कन्या निळ्ऑफर यांचे पाती असलेल्या समीर खान यांना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) समीर यांना मुच्छड पानवाला ड्रग्ज प्रकरणात हे समन्स बजावले होते. त्यावरून त्यांची बुधवारी सकाळपासून चौकशी सुरू होती.

या प्रकरणातील संशयित करण सजनानी  याच्याबरोबार समीर खान यांचा गुगल पेद्वारे 20 हजार रुपयांचा व्यवहार झाल्याचे निष्पन्न झाले असून सजनानी यांना त्यांनी ड्रग्ज पुरवल्याच्या बदल्यात समीर यांनी हे 20 हजार रुपये पाठवल्याचे सांगितले जात आहे.

अधिक वाचा  पुणे पदवीधर निवडणूक महायुती आणि महाविकास आघाडीत बंडखोरी

एनसीबीने गेल्या आठवड्यात ब्रिटीश नागरिक करण सजनानी आणि राहिला फर्निचरवाला यांच्याकडून 200 किलोचे ड्रग्ज जप्त केले होते. याप्रकरणी केम्प कॉर्नर येथील प्रसिद्ध मुच्छड पानावाला यालाही अटक करण्यात आली असून त्याला न्यायदंडाधिकाऱ्यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्याशिवाय मुच्छड पानवाला दुकानाचे मालक रामकुमार तिवारी यालाही एनसीबीने ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी अटक केली आहे. गांजा, ड्रग्ज विकताना तिवारी पकडला गेला होता. त्यामुळे त्यालाही तुरुंगात टाकण्यात आलं आहे.

दरम्यान, या प्रकरणी नवाब मलिक यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love