खडसेंचे वकील अ‌ॅड. असीम सरोदे यांच्या कार्यालयात येणार ईडीचे अधिकारी

राजकारण
Spread the love

पुणे—भाजपमधून नुकतेच राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेले माजीमंत्री एकनाथ खडसे यांच्या पुण्यातील भोसरी जमीन खरेदी प्रकरणी पुण्यातील अ‌ॅड. असीम सरोदे यांच्याकडे खडसे यांचे वकीलपत्र आहे. भोसरी जमीन खरेदी प्रकरणी एकनाथ खडसेंना 30 डिसेंबर रोजी हजर राहण्याचे ईडीचे समन्स मिळाले होते. भोसरी जमीन खरेदी प्रकरणी एकनाथ खडसेंना ईडीकडून नोटीस बजावण्यात आहे. त्या पार्श्वभूमीवर, एकनाथ खडसेंच्या केससंदर्भातील कागदपत्रांचा तपास करण्यासाठी ईडीचे अधिकारी अ‌ॅड. असीम सरोदे यांच्या कार्यालयात दुपारी येणार आहेत, त्यांना तसा ईडीकडून फोन आल्याची माहिती आहे.   

 एकनाथ खडसेंच्या केसमध्ये अ‌ॅड. असीम सरोदे हे खडसेंचे वकील आहेत. त्यासंबंधी माहिती घेण्यासाडी ईडीचे अधिकारी सरोदे यांच्या कार्यालयात जाऊन माहिती घेणार आहे.  ईडीची टीम सरोदेंच्या कार्यालयात 3.30 वाजता पोहोचणार आहे.  अ‌ॅड. असीम सरोदे दोन हजार पानांची माहिती ईडीकडे देण्याची शक्यता आहे.  एकनाथ खडसे यांना ईडीकडून भोसरी जमीन प्रकरणी 30 डिसेंबरला ईडीसमोर हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले होते. मात्र, एकनाथ खडसेंना कोरोना झाल्यामुळे ते ईडीसमोर हजर राहिले नव्हते.

ईडीची नोटीस आल्याचे एकनाथ खडसेंनी मान्य केले होते. ईडीसमोर हजर राहण्यापूर्वीच एकनाथ खडसेंना कोरोनाची लागण झाली. त्यामुळे ईडीनं त्यांना 14 दिवसानंतर हजर राहण्याची मुभा दिली होती. या पार्श्वभूमीवर ईडीची टीम अ‌ॅड. असीम सरोदे यांच्याकडे खडसेंच्या कागदपत्रांबद्दल तपास करणार आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *