भाजपचे १९ नगरसेवक बंडाच्या पावित्र्यात?

पुणे —पुणे महापालिकेत सत्तेत असलेल्या भाजपचे १९ नगरसेवक नाराज असून ते बंडाच्या पवित्र्यात असल्याच्या चर्चेने पुण्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. हे नाराज नगरसेवक महाविकास आघाडीमध्ये सामील होणार असल्याच्या चर्चाही रंगू लागल्या आहेत. मात्र, यात कोणतेही तथ्य नाही. भाजपचा एकही नगरसेवक पक्ष सोडून जाणार नाही, उलट मी विरोधकांना आवाहन करेल की आपापले पक्ष संभाळा. येणारी […]

Read More

मंत्री नवाब मलिकांचे जावई समीर खान यांच्या अटकेने राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडी सरकारच्या अडचणी वाढल्या

मुंबई : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या विवाहबाह्य संबंधाचे प्रकरण समोर आल्याने आणि त्यांच्यावरील आरोपाने अडचणीत सापडलेल्या राष्ट्रवादी कॉँग्रेसची आणि महाविकास आघाडी सरकारची आता आणखी एका प्रकरणामुळे गोची झाली आहे.राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना ड्रग्ज प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) दहा तासांच्या चौकशीनंतर अटक केल्याने […]

Read More

खडसेंचे वकील अ‌ॅड. असीम सरोदे यांच्या कार्यालयात येणार ईडीचे अधिकारी

पुणे—भाजपमधून नुकतेच राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेले माजीमंत्री एकनाथ खडसे यांच्या पुण्यातील भोसरी जमीन खरेदी प्रकरणी पुण्यातील अ‌ॅड. असीम सरोदे यांच्याकडे खडसे यांचे वकीलपत्र आहे. भोसरी जमीन खरेदी प्रकरणी एकनाथ खडसेंना 30 डिसेंबर रोजी हजर राहण्याचे ईडीचे समन्स मिळाले होते. भोसरी जमीन खरेदी प्रकरणी एकनाथ खडसेंना ईडीकडून नोटीस बजावण्यात आहे. त्या पार्श्वभूमीवर, एकनाथ खडसेंच्या केससंदर्भातील कागदपत्रांचा तपास […]

Read More
T

महाविकास आघाडीने एकत्रित काम केल्याचा आणि सरकारच्या एक वर्षाच्या कामगिरीचा विजय -शरद पवार

पुणे- महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकांचा निकाल हा महाविकास आघाडीने एकत्रित काम केल्याचा आणि महाविकास आघाडी सरकारच्या एक वर्षाच्या कामगिरीचा विजय आहे अशी पहिली प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिली आहे. पुण्यामध्ये पत्रकारांशी बोलताना पवार यांनी ही प्रतिक्रिया दिली. भाजपचा बालेकिल्ला समजला जाणारा नागपूर पदवीधर मतदारसंघ, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस […]

Read More

#पुणे पदवीधर: महाविकास आघाडीचे अरुण लाड यांचा दणदणीत विजय

पुणे- विधानपरिषदेच्या विधान परिषदेच्या लक्षवेधी ठरलेल्या पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास महाविकास आघाडीचे उमेदवार राष्ट्रवादीचे अरुण लाड यांनी भाजपाचे उमेदवार संग्राम देशमुख यांचा धोबीपछाड करत सुमारे 48 हजार 824 मतांनी दणदणीत पराभव केला, सुरुवातीला एकतर्फी चुरशीची वाटलेली हे निवडणूक एकतर्फी झाली.  लाड यांनी पहिल्या पसंतीच्या क्रमांकावरच विजय संपादित केल्याने दुसऱ्या क्रमांकाची मतांची मतमोजणी करण्याची वेळ […]

Read More

पुणे पदवीधरसाठी तब्बल 62 तर शिक्षक मतदार संघासाठी ३५ उमेदवार रिंगणात

पुणे–पुणे पदवीधर मतदारसंघासाठी अर्ज माघारीची मुदत काल (मंगळवार) संपली. पुणे पदवीधरच्या  16 तर शिक्षक मतदार संघातील तर 15 जणांनी माघार घेतली आहे. या निवडणुकीत पुणे पदवीधर मतदारसंघासाठी 62 उमेदवार रिंगणात आहेत. तर शिक्षक मतदारसंघासाठी 35 उमेदवार रिंगणात राहिले आहेत. पदवीधर मतदारसंघासाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या प्रमुख प्रतिस्पर्धी पक्षामध्ये बंडखोरी झाली होती. बंडखोरी मिटवण्यात दोन्ही […]

Read More