#पुणे पदवीधर: कोण मारणार बाजी? वाढलेल्या मतदानाचा फायदा कोणाला होणार?


पुणे : पुणे पदवीधर मतदार संघाच्या एका जागेसाठी मंगळवारी मतदान झाले. यावेळी झालेल्या विक्रमी मतदानामुळे आता सर्वांचे लक्ष्य या वाढलेल्या मतदानाचा फायदा नक्की कोणाला होणार आणि कोण बाजी मारणार याकडे लागले आहे. उद्या (गुरुवार)डी. ३ डिसेंबर रोजी पुण्यातील बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात मतमोजणी होणार आहे.

पुणे पदवीधरच्या जागेसाठी यावेळी तब्बल ६२ उमेदवार होते. भाजपाचे संग्राम देशमुख महाविकास आघाडीचे अरुण लाड मनसेच्या रुपाली पाटील-ठोंबरे तर डॉ. श्रीमंत कोकाटे, निता ढमाले आणि शरद पाटील या पक्ष उमेदवारांमुळे ही निवडणूक चुरशीची होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. भाजपचे संग्राम देशमुख आणि महाविकास आघाडीचे अरुण लाड यांच्यातच प्रमुख लढत होणार असली तरी मतदानाची वाढलेली टक्केवारी कोणामुळे वाढली आणि त्याचा फायदा नक्की कोणाला होणार आणि कोणाला फटका बसणार हे उद्याच्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. पुणे विभागात पदवीधर मतदार संघातल्या पाच जिल्ह्यात 2 लाख 47हजार 50 इतके मतदान झाले असून एकूण मतदानाच्या 57.96 टक्के मतदान झाले आहे

अधिक वाचा  #Girish Gautam | कायदा बदलून काही होणार नाही, मानसिकता बदलण्याची गरज आहे - गिरीश गौतम

राष्ट्रवादीकडून इच्छुकांची यादी मोठी होती. त्यामध्ये डॉ. श्रीमंत कोकाटे आणि नीता ढमाले यांची नावे होती. त्यांनी बंडखोरी केली आहे. डॉ. श्रीमंत कोकाटे यांनी गेल्या अनेक दिवसांपासून तयारी सुरु केली होती. मनसेच्या रुपाली पाटील- ठोंबरे यांनीही जोरदार प्रचार करून आघाडी घेतली होती तर शरद पाटील यांनीही जोरदार प्रचार केला होता. पदवीधर निवडणुकीसाठी पदवीधरांचे नावनोंदणी महत्वाची असते. भाजपा आणि महाविकास आघाडीकडून यावेळी यासाठी जोरदार मोहीम राबवली गेली. त्यांच्याबरोबर डॉ. कोकाटे, रुपाली पाटील आणि शरद पाटील व इतर उमेदवारांनीही जोरदार मोहीम राबवली त्यामुळे यावेळी मतदानाची टक्केवारी वाढली असल्याचे बोलले जात आहे. मात्र, यामध्ये कोण कोणाची मतं खातं, कोणाला कुठून चांगले मतदान होते यावर कोण बाजी मारणार हे ठरणार आहे. संग्राम देशमुख आणि अरुण लाड यांच्यामध्ये लढत होणार असली तरी डॉ. कोकाटे, रुपाली पाटील, शरद पाटील यांना जर चांगली मते पडली तर त्यात आश्चर्य वाटायला नको.

अधिक वाचा  नरेंद्र मोदींचे विकसित भारताचे स्वप्न साकारण्यासाठी भाजपच्या पाठीशी उभे राहा : आप्पा रेणुसे मित्र परिवाराच्या वतीने आयोजित स्नेहमेळाव्यामध्ये मान्यवरांचे आवाहन

भाजपची यंत्रणा मतदाराला मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी जशी सक्रीय असते तशीच यंत्रणा यावेळी महाविकास आघाडीचीही बघायला मिळाली. त्यामुळे वाढलेले मतदान कुणाच्या पथ्यावर पडणार आणि कुणाला फटका बसणार हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

 भाजपा विरुध्द महाविकास आघाडी अशी निवडणूक अशी असली तरी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील विरुध्द राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यात ही लढाई आहे. त्यामुळे ही निवडणूक दोघांच्याही प्रतिष्ठेची आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love