Pull the BJP down from power, which gives royal recognition to corruption

काश्मिरी पंडीतांची हत्या ‘भाजप सत्ताकाळातच’ : गोपाळदादा तिवारी

राजकारण
Spread the love

पुणे – काश्मिरी पंडीतांचे विस्थापन झालेल्या १९९० साली, “भाजप पाठींब्यावरच” पंतप्रधान व्हीपी सिंग सरकारची सत्ता देशात होती, हे देशवासियांना स्मरण देणे गरजेचे असुन, ‘काश्मिर मधील लोकनियुक्त सरकार’ केंद्राने बरखास्त करून, राज्यपाल श्री जगमोहन यांचे माध्यमातून ‘राष्ट्रपती राजवट’ लागू केली होती, हे सत्य लोकांपुढे येणे गरजेचे असल्याचे काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे म्हटले आहे.

एकहाती राष्ट्रपती राजवटी’ची सत्ता असून देखील ‘तेंव्हाचे सत्ताधारी भाजप’ काश्मिर पंडींतांवरील हल्ले व विस्थापिकरण रोखू शकले नाहीत वा त्यांना सुरक्षा ही पुरवी शकले नाही ही भाजपच्या ‘नामुष्कीची वास्तवता’ दुर्लक्षीत करता येणार नाही..! ऊलटपक्षी, तत्कालीन काँग्रेसनेते स्व राजीव गांधीं सह विरोधी पक्षांनी ‘काश्मिर मध्ये लष्कर पाठवण्याची मागणी केली होती’.. परंतू (तत्कालीन मंत्री जसवंत सिंह यांनी) ‘राज्यपाल जगमोहन परीस्थिती सक्षमपणे हाताळतील’ असे सांगून ‘लष्कर पाठवण्याची विरोधकांची मागणी’ व्हीपी सिंग सरकारने फेटाळली… राजीव गांधींचे नेतृत्वाखाली काश्मिरींचे विस्थापीकरण व हल्ल्यांच्या निषेधार्थ  संसदेस घेराव देखील घालण्यात आला होता.. हे सत्य देखील पुढे आले पाहीजे…

आता मात्र भाजप हिंदुंविषयी खोटा कळवळा आणत, ढोंगी पणाचे, धार्मिक भेदभाव व ध्रूवीकरणाचे हिन पातळीवरील राजकारण देशात करू पहात आहे.. ही बाब निंदनीय असल्याचे सुतोवाच देखील गोपाळदादा तिवारी यांनी केले..!

तेंव्हा पाकिस्तानी अतिरेक्यांनी काश्मिरवर केलेल्या हल्ल्यात पंडीतांबरोबरच ईतर धर्मिय देखील मोठ्या प्रमाणात होते तसेच पुर्वीच्या केंद्र व राज्यातील सरकारांनी ही १९४७ ते १९९० तब्बल ४० वर्षे काश्मिरी पंडीतांची सुरक्षा अबाधित ठेवली होती ही बाब देखील स्पष्ट झाली असल्याचे ही गोपाळदादा तिवारी यांनी सांगितले…

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *