भारतिय संस्कृतीत विवाहानंतर सासरचे नाव लागते याचे भान मोदींना नाही का?- गोपाळदादा तिवारी

‘हिंसेला चिथावणी देणाऱ्या ‘गायकवाड - बोंडेंवर गुन्हे दाखल करा
‘हिंसेला चिथावणी देणाऱ्या ‘गायकवाड - बोंडेंवर गुन्हे दाखल करा

मुंबई – स्वकर्माची पापे व अपयशे झाकण्यासाठी मोदी देशातील ‘दुसऱ्या क्रमांकाच्या लोक भावनेची व जनतेने विरोधीपक्ष म्हणून दिलेल्या पसंतीची’ कुचेष्टा करीत खिल्ली उडवणे, हा देशातील दुसऱ्या क्रमांकाचे मतदान करणाऱ्या जनतेचा अपमान असल्याची उपरोधिक टिका काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी पंतप्रधान मोदी यांनी आज राज्यसभेत केलेल्या काँग्रेस नेते व खासदार राहुल गांधी आणि आई श्रीमती सोनीया गांधी हे आपले आडनाव नेहरू का लावत नाही.? गांधी का लावतात? या वक्तव्यावर केली आहे.भारतिय संस्कृतीत विवाहानंतर सासरचे नाव लागते याचे भान मोदींना नाही का? असा सवालही गोपाळ तिवारी यांनी केला आहे.

तिवारी म्हणाले, इंग्रजांविरोधी स्वातंत्र्य लढ्यात तब्बल ७ वेळा अटक होऊन, ११ वर्षे जेल यातना भोगलेले, थोर स्वातंत्र्य सेनानी स्वातंत्र्योत्तर भारताचे पहिले पंतप्रधान स्व. पंडीत नेहरू यांची कन्या इंदीरा यांचे “हिंदू विवाह (अग्निसाक्ष सप्तपदी) संस्कारांनंतर पती सौ. इंदीरा फीरोझ गांघी असे आडनांव लागले. पुढे पं. नेहरू यांच्या निधनानंतर (त्यांचे पश्चात) लाल बहादूर शास्त्री यांच्यानंतर इंदीराजी गांधी काँग्रेस अध्यक्षा व पुढे पंतप्रधान झाल्या. त्या नंतर त्यांचे सुपुत्र राजीव गांधी देखील देशाचे पंतप्रधान झाले व अर्थात त्यांचे सुपुत्र राहूलजी गांधी हे काँग्रेसचे नेतृत्व करीत आहेत.

अधिक वाचा  कुणी काही बोलले म्हणून मी ‘अरेला कारे' करणार नाही- सुप्रिया सुळे

भाषणजीवी पंतप्रधान मोदी हे ज्या निवडणुकीत देशातील जनतेने ३१ व ३७ % मते देऊन भाजपला २०१४ व २०१९ दोन्ही वेळेस सत्तास्थानी बसवले आहे. त्याच वेळी दोन्ही निवडणुकीत व २०१४ नंतरच्या विविध राज्यातील निवडणुकीत याच देशातील जनतेने काँग्रेसला ‘दुसऱ्या क्रमांकाचे सुरक्षा कवच’ दिल्याचे सोईस्कर पणे कसे विसरतात.? असा संतप्त सवाल देखील काँग्रेस ने केला. मात्र स्वकर्माची पापे व अपयशे झाकण्यासाठी मोदी देशातील ‘दुसऱ्या क्रमांकाच्या लोक भावनेची व जनतेने विरोधीपक्ष म्हणून दिलेल्या पसंतीची’ कुचेष्टा करीत खिल्ली उडवणे, हा देशातील दुसऱ्या क्रमांकाचे मतदान करणाऱ्या जनतेचा अपमान असल्याची उपरोधिक टिका काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी पंतप्रधान मोदी यांचे भाषणानंतर व पातळी सोडून केलेल्या आरोपांवर केली.

अधिक वाचा  प्रभू रामचंद्रांशी राहुल गांधींची तुलना केल्याबद्दल कॉंग्रेसने माफी मागावी- मुरलीधर मोहोळ

महात्मा गांधी, नेहरू, आझाद, बोस व पटेलांच्या नेतृत्वाखाली काॅग्रेस ने देशास स्वातंत्र्य मिळवून दिल्या मुळे व डॅा आंबेडकरांच्या संवैधानिक लोकशाहीच्या स्थापनेमुळे व ती (२०१४ अखेर) ६४ वर्षे जीवंत ठेवल्यामुळे भाषणजीवी ‘मोदींचा भाजप’ सत्ता स्थानी आला, किमान याचे भान व जाणीव अहंकारी मोदींना नसावी हे दुर्दैव आहे.

 “देशाच्या संसद रूपी मंदीरात, लोकशाही मार्गाने देशातील जनतेनेच् निवडून पाठवलेल्या लोकप्रतिनिधींच्या प्रश्नांना ऊत्तरे न देणे, त्यांच्या आरोपांचे समाधान न करणे व आपल्या राजकीय ऊत्तरदायीत्वापासुन पळ काढणे, धुळ फेक करणे हे जनता ऊघड्या डोळ्यांनी पहात आहे.

स्वातंत्र्य लढ्यात ब्रिटीश धार्जिण भुमिका घेणाऱ्यांना, भारत स्वतंत्र होऊन २१ व्या शतकात वाटचाल करू लागला आहे आर्थिक महासत्ता बनू लागला हेच मुळी खटकते आहे. म्हणूनच स्वातंत्र्याची शिल्पकार काँग्रेस व त्यांचे नेत्यां विरोघी प्रसंगी व्यक्तीगत व खालच्या पातळींवर भाषणजीवी मोदी शर्मयुक्त विधाने करीत आहेत, अशी टिकाही गोपाळदादा तिवारी यांनी केली आहे.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love