पुण्यात रंगणार दृष्टीहिनांसाठीची राष्ट्रीय बुद्धीबळ स्पर्धा

पुणे-मुंबई
Spread the love

पुणे : दृष्टीहिनांसाठी देशातील सर्वात मोठ्या बुद्धीबळ स्पर्धांपैकी एक असलेली ‘सावा हर्बल्स एआयसीएफबी नॅशनल चेस चॅम्पियनशिप फॉर व्हिज्युअली चॅलेंजड्’ ‘ Sava Herbals AICFB National Chess Championship for Visually Challenged’ ही राष्ट्रीय बुद्धीबळ स्पर्धा ५ ते ९ एप्रिल या कालावधीत पुण्यातील पीवायसी हिंदू जिमखाना येथे रंगणार आहे. ऑल इंडिया चेस फेडरेशन फॉर ब्लाइंड( एआयसीएफबी) All India Chess Federation for the Blind आणि रोटरी क्लब ऑफ पुणे हेरिटेज यांनी संयुक्तपणे ही स्पर्धा आयोजित केली आहे.

स्पर्धेत सहभागी होणारे सर्व ५२ स्पर्धक राज्य आणि विभागीय स्तरावरील बुद्धीबळ स्पर्धेतील आपापल्या कामगिरीमुळे या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत.  महिला, पुरुष आणि १९ वर्षांखालील अशा तिन्ही गटातील स्पर्धकांचा यामध्ये सहभाग असून स्पर्धेत पहिला क्रमांक मिळवणारे स्पर्धक आगामी आंतरराष्ट्रीय बुद्धीबळ स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करतील. स्पर्धेच्या विजेत्याला राष्ट्रीय विजेता असे घोषित करण्यात येते.

नऊ फेऱ्यांमध्ये आयोजित ही स्पर्धा स्वीस लीग पद्धतीवर  आधारित असेल. यामध्ये दरदिवशी चार तासांच्या दोन फेऱ्या असतील. फिडे आणि आयसीबीए या नियमक संस्थांच्या नियमांनुसार ही स्पर्धा खेळली जाईल. स्पर्धेतील विजेत्यांसाठी बक्षिसाची रक्कम ही दीड लाख रुपये इतकी असेल. तसेच स्पर्धेदरम्यान सहभागी खेळाडू, शिक्षक आणि प्रशिक्षक यांच्या निवासाची व्यवस्था आयोजकांद्वारे करण्यात येईल.

एआयसीएफबी ही आंतरराष्ट्रीय ब्रेल बुद्धिबळ संघटना (IBCA), अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघ (भारत सरकारद्वारे मान्यताप्राप्त) आणि फिडे वर्ल्ड चेस फेडरेशनशी संलग्न आहे.  विना  नफा या तत्वावर काम करणारी ही संघटना इंडियन सोसायटी ट्रस्ट आणि बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ऍक्ट १९५० अंतर्गत नोंदणीकृत असून, गेल्या २४ वर्षांपासून बुद्धिबळ खेळाच्या माध्यमातून दृष्टिहीन लोकांच्या विकासासाठी कार्यरत आहे.

एआयसीएफबीला भारत सरकारद्वारे मान्यताप्राप्त सर्वोच्च बुद्धिबळ संस्था असलेल्या एआयसीएफ आणि अंध आणि दृष्टिहीनांसाठी सर्वोच्च जागतिक बुद्धिबळ संस्था असलेल्या आंतरराष्ट्रीय ब्रेल बुद्धिबळ संघटना यांनी अधिकृत मान्यता दिली आहे. या मान्यतांमुळे एआयसीएफबी ही संघटना दृष्टिहीन खेळाडूंना राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील बुद्धीबळ स्पर्धांमध्ये त्यांची प्रतिभा आणि क्षमता सिद्ध करण्याची संधी देऊ शकते.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *