This verdict will help Uddhav Thackeray to gain a strong position in the Supreme Court

मी अजून म्हातारा झालो नाही – शरद पवार

महाराष्ट्र राजकारण
Spread the love

पुणे–राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी पुण्यातील शिरुर येथे रामलिंग महाराज यात्रोत्सवात आयोजित राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेच्या बक्षिस वितरण सोहळ्याला उपस्थिती लावली.यावेळी शरद पवारांनी केलेल्या भाषणाची सध्या चांगलीच चर्चा सुरु आहे. व्यासपीठावर उपस्थित आयोजकांनी यावेळी शरद पवारांच्या वयाचा उल्लेख केल्यानंतर त्यांनी आपण अजून म्हातारे झालो नसल्याचं म्हटलं आणि त्याला उपस्थितांनीही टाळ्या वाजवत शरद पवारांच्या वक्तव्याला दुजोरा दिला.

व्यासपीठावर बोलताना आयोजकांनी शरद पवारांच्या वयाचा उल्लेख केला होता. यानंतर शरद पवार भाषणासाठी उभे राहिले. यावेळी त्यांनी मी अजून म्हातारा झालो नाही असं मिश्किलपणे म्हटलं. यानंतर उपस्थितांनीही टाळ्या वाजवत शरद पवारांच्या वक्तव्याला दुजोराच दिला.

“मी आयोजकांवर नाराज आहे. माझी त्यांच्यावर नाराजी आहे. आयोजक बोलले की या वयात. मी काही अजून म्हातारा झालेलो नाही, ” असं शरद पवार म्हणाले. शरद पवारांनी यावेळी विरोधकांवरही अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. ते म्हणाले की, “कुस्तीगीर परिषदेचा माझा जुना संबंध आहे. मी कुस्तीगीर परिषदेचा अध्यक्ष आहे. नवनवीन पैलवान तयार होत असल्याचा आनंद आहे. राजकारण एका बाजूला आणि क्रीडा क्षेत्र एका बाजूला. मी क्रीडा क्षेत्रात कधी राजकारण येऊ देत नाही आणि राजकारणात जेव्हा कुस्ती करायची तेव्हा कुस्ती करायची”.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *