अजित पवारांनी जयंत पाटलांना सल्ला देताच उडाला हास्यकल्लोळ: काय दिला सल्ला


पुणे— आम्ही पुण्यात लोकांना मास्क घालावे यासाटी  मास्क न घालणाऱ्याकडून ५०० रुपये दंड  वसूल केला. त्यापोटी आतापर्यंत ७ कोटी ४५ लाख वसूल केले. किती दंड वसूल केला हा मुद्दा महत्त्वाचा नाही. पण लोकांना सवय लागते. सांगली जिल्ह्यात तातडीने दंड आकारणी सुरू केली तर ५० लाख, एक कोटी मागण्याची वेळ येणार नाही, असा सडेतोड सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जलसंपदामंत्री जयंत पाटलांना दिला. अजित पवार यांच्या या सल्ल्याला जयंत पाटील यांनी  अर्थमंत्र्यांच्या ‘त्रासा’ची नोंद घेतली असून, त्यांच्या सूचनेची त्वरीत अंमलबजावणी सुरू करू असे सांगताच व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये हशा पिकला.

पुण्यात विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पुणे जिल्ह्याचा कोरोना आढावा बैठक घेण्यात आली. यानंतर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थिती व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संपूर्ण राज्याचा आढावा घेतला. त्यावेळी व्हिडिओ काॅन्फरन्समध्ये सुरूवातच सांगली जिल्ह्यापासून झाली. या बैठकीत पाटील यांनी रुग्णसंख्या आणि मृत्यूदर वाढत आहे. तसेच सांगली जिल्ह्यात मास्क न घालणाऱ्यांना ग्रामीण भागात वेगळा दंड आणि शहरी भागात वेगळा दंड घेतला जातो.हा दंड संपूर्ण राज्यात सारखाच करण्याची मागणी केली. तसेच सांगली जिल्ह्यात कोरोनाच्या विविध उपाययोजनासाठी निधीची गरज असून,  त्वरीत उपलब्ध करून द्यावी अशी देखील मागणी केली.

अधिक वाचा  ..ते म्हणजे महाराष्ट्र नव्हे, कोणाला म्हणाले असे देवेंद्र फडणवीस?

यावर अजित पवार  म्हणाले, मुख्यमंत्रीसाहेब, एकट्या सांगलीने एक तास घेतला. इतर सर्वांनी थोडे उरकते घ्यावे. त्याचवेळी त्यांनी  जयंत पाटलांना एक ‘रोखठोक’ सल्लाही दिला. ते म्हणाले, आम्ही पुण्यात लोकांना मास्क घालण्याची सवय लागावी म्हणून ५०० रुपये दंड करून आतापर्यंत ७ कोटी ४५ लाख वसूल केले. किती दंड वसूल केला हा मुद्दा महत्त्वाचा नाही. पण लोकांना सवय लागते. सांगली जिल्ह्यात तातडीने दंड आकारणी सुरू केली तर ५० लाख, एक कोटी मागण्याची वेळ येणार नाही. यावर जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी देखील तितक्याच नम्रपणे अर्थमंत्र्यांच्या ‘त्रासा’ची नोंद घेतली असून, त्यांच्या सूचनेची त्वरीत अंमलबजावणी सुरू करू असे सांगताच व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये मुख्यमंत्र्यासह सर्वांनाच हसू फुटले.पवार यांनी पुणे जिल्ह्यात सरसकट मास्क न घालणा-यांना 500 रुपये आणि रस्ता , सार्वजनिक ठिकाणी थुंकणा-याला 1000 रुपये दंड घेतला जातो. गेल्या काही दिवसांत तब्बल 7 कोटी 75 लाखांचा दंड वसूल झाल्याचे सांगत… जयंतराव तुमच्याकडे देखील त्वरीत अंमलबजावणी सुरू करा म्हणजे दंड मागण्याची वेळ येणार नाही असे सांगितले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love