निष्पापांचे बळी जाण्यावर,जाब विचारणे,खंत, दुःख व संताप व्यक्त करणे हे राजकारण नाही


पुणे-महाराष्ट्र शासनाचा ‘महाराष्ट्र भुषण’ पुरस्कार हा जेष्ठ समाजसेवक प.पु. नानासाहेब धर्माधिकाऱींचा वारसा आपण चालवत असल्याने आपणांस मिळाल्या बद्दल दुमत नाही, आपले अभिनंदन..! मात्र खारघर येथे रखरखत्या उन्हात, विनाशेड – विनामंडप समारंभ आयोजित केल्यामुळे व सरकारी तिजोरीतुन तब्बल १३,६१,५१००० खर्च होऊन देखील ढीसाळ नियोजनातील अक्षम्य त्रुटीं बद्दल, राज्यातील निरागस निष्पाप नागरीकांचे बळी जाण्यावर, सत्ताधारी आयोजकांना जाब विचारणे, खंत, दुःख व संताप व्यक्त करणे हे राजकारण नाही हे आदरणीय आप्पासाहेबांना विनम्रपणे सांगु इच्छीत आहोत.. असे जाहीर प्रतिपादन काँग्रेस चे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केले..!

महाराष्ट्र शासनाने’ कररूपी पैश्यातुन, तब्बल १३॥ कोटींचा निधी फक्त “मंडप व कार्यक्रम खर्चासाठी” वापरल्याचे समोर आले आहे.. तरी देखील ‘मंडप-शेड’ का दिसल्या नाहीत..(?)

या व्यतिरिक्त महाराष्ट्र व कदाचित देशातील अनेक वृत्त-पत्रांनध्ये पुर्ण पान जाहिरातीं मध्ये सर्वसमावेशक ‘कार्यक्रम पत्रीका’ कुठेही दिसली नाही. घटनात्मक पदी असलेल्या मा विरोधीपक्ष नेत्यांचे वा इतर पक्षीय नेत्यांच्या नावांचा तर कुठेही किमान उल्लेख देखील नव्हता.

अधिक वाचा  सीमावर्ती भागातील लोकसंख्येच्या प्रमाणात वाढत चाललेले असंतुलन देशाच्या ऐक्यास, अखंडतेस आणि सांस्कृतिक ओळखीचा विचार करता गंभीर संकटाचे निमित्त होऊ शकते- सरसंघचालक डॉ.मोहनजी भागवत

आपल्या व समर्थ परीवारच्या सामाजिक कार्या विषयी नितांत आदर व्यक्त करीत, आम्ही कालच्या “आपल्या (राजकारण न करण्याच्या) निवेदनावर” प्रतिक्रिया पर भावना व्यक्त करीत आहोत. मात्र आपल्या सामाजिक कार्याच्या पुण्याईवर कोणी ही पक्षाने राजकीय पोळी भाजू नये, हीच ईच्छा व अपेक्षा..!

पुर्वीच्या काँग्रेस – राष्ट्रवादी आघाडी सरकारने स्व प.पु. नानासाहेब धर्मांधिकारी यांना १ मार्च २००२ रोजी “समाज भूषण” व २६ नोव्हे (थंडी चे दिवसांत, निसर्गाचे सानिध्यात) २००८ रोजी मरणोपरांत “महाराष्ट्र भूषण” पुरस्कार मा आप्पासाहेब धर्माधिकारी यांना (आपणाकडे) तत्कालीन मुख्यमंत्री स्व श्री विलासराव देशमुख व उपमुख्य मंत्री आर आर पाटील यांनी बहाल केला.. यांचे ही स्मरण देऊ ईच्छीतो.. मात्र त्या समारंभात एका ही उपासकास वा नागरिकास अल्प ईजा ही पोहोचली नव्हती हे देखील विनम्रपणे निदर्शनास आणीत आहोत..

अधिक वाचा  चित्रकलेतील त्रिमूर्तीचे शक्तीदर्शन : चित्रकार आदिती मालपाणीच्या कलाकृतीने  घातली  सर्वांना मोहिनी

आपले व स्व नाना साहेबांचे व श्री बैठकांद्वारे घडत असलेले, धर्म-जात-पंथ विरहीत ‘मानवता-वादी संस्कार व शिकवण’ अतुलनीय आहे. आपल्या श्री समर्थ परीवाराच्या पुण्याईच्या बळावरील लोकसंग्रहास, केवळ पुरस्काराने अंकीत करून, त्याचा ‘राजकीय लाभ’ ऊचलण्याचाच हा भाजप’चा प्रयत्न आहे, त्यामुळे यांत देखील राजकारण दडलेले आहे. मात्र आपल्या सारख्या संत प्रवृत्तीच्या महामानवाच्या दृष्टीकोनात ते कदाचित येणार ही नाही. मात्र समर्थ परीवारातील निरागस व निष्पाप मृत्युमुखी पडलेले श्री उपासक हे प्रथम ‘राज्याचे नागरीक’ देखील आहेत.. त्यामुळे राज्यातील जनतेस देखील या दुर्दैवी धटनेचे तीव्र दुःख, संताप व ऊद्गीनता आहे.. लोकशाही रुपी व्यवस्थेत त्या व्यक्त होणे स्वाभाविक व नैसर्गिक आहे.. रोष हा आपल्यावर नसुन सत्तांध सत्ताधारी व असंवेदनशील व्यवस्थे विषयी आहे.. यात कोणतेही राजकारण नाही, हे विनम्रपणे सांगु इच्छीत आहोत..

अधिक वाचा  लॉकडाऊनवरून पुण्यातील राजकीय वातावरण तापले- आरोप प्रत्यारोपांच्या फैरी

मात्र काल या विषया वरील चर्चे दरम्यान मराठी वृत्त-वाहिनी वर भाजप प्रवक्त्याने एवढ्या मोठ्या प्रमाणात हिंदु जमले (?) याची पोटदुखी असल्याचे व निंदनीय विधान केले.. ते मात्र आपल्या धर्म – पंथ विरहीत मानवतावादी हेतूस छेद देणारे असुन राजकीय हेतुने निश्चित प्रेरीत आहे.. त्यामुळे धर्म-पंथ विरहीत सामाजिक उन्नतीचे कार्य करण्याच्या आपल्या प्रयत्नांना, ‘राजकीय वळण’ कोण देते (?) याचा आपणच साकल्याने विचार करावा, असेही काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात केले आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love