मुंबई -शिंदे-फडणवीसांच्या सरकारला सत्ताघाऱ्यांच्या कर्तव्यानुसार, राज्याच्या राजधानीतच् ‘शिवाजीपार्क’ मधील कायदा सुव्यव्स्था जर हाताळता येत नसेल, तर त्यांनी वेळीच पायऊतार व्हावे, अशी टिका काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी देलेल्या प्रसिध्दी पत्रकात केली आहे.
ऊध्दव ठाकरेंची शिवसेना व मुख्यमंत्री शिंदे गटाची कथित शिवसेना’ हे शिवाजी पार्क येथील ‘दसरा मेळावा परवानगी’ वरून आमने सामने आले व त्यामध्ये न्यायालयाने ऊध्दवजी ठाकरे यांच्या बाजूने निकाल दिला. मात्र या ‘न्यायालयीन लढाईत’ न्यायप्रविष्ट – सत्ताधीश मुख्यमंत्री शिंदेगट, ‘मुंबई मनपा व पोलीस खात्याच्या’ बाजूने, वारंवार “कायदा व सुव्यवस्थे”प्रश्नी भिती, शंका व प्रश्न सतत ऊपस्थित करण्यात आल्याचे राज्यातील जनतेने पाहीले.
या पार्श्वभूमिवर गोपाळ तिवारी यांनी राज्यातील न्यायप्रविष्ट शिंदे – फडणवीस सरकार जर ‘स्वपक्षाचा म्हणवणाऱ्या शिवसेनेच्या मेळावा व जाहीर सभेसाठीची सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात कमी पडत असेल वा तसा आत्मविश्वास नसेल, सतत कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न ऊपस्थित करून, गृह खाते व मुंबई पोलीसांच्या सक्षमतेवर अविश्वास व्यक्त करत असेल व त्यायोगे आपली असमर्थताच स्पष्ट करत असेल, तर त्यांनी तातडीने सत्तेवरून पाय ऊतार होणेच चांगले. जेणे करून राज्यास पुन्हा कायदा सुव्यवस्थेचे नियंत्रण राखणारे व ते राखण्याची क्षमता ठेवणारे मविआ चे सरकार प्रस्थापित होऊ द्यावे व राज्याच्या सुरक्षेशी व जीवीत वस्तु हानीं विषयी खेळु नये, अशी ऊपरोधीक टिका देखील काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली आहे.