पुण्यातील बेपत्ता उद्योजक गौतम पाषाणकर यांचा अखेर लागला शोध


पुणे– गेल्या ३३ दिवसांपासून बेपता असलेले पुण्यातील प्रसिध्द उद्योजक गौतम पाषाणकर यांचा शोध लावण्यात अखेर पोलिसांना यश आले असून पाषाणकर यांना राजस्थानातील जयपूर येथील एका हॉटेलमधून पोलिसांनी   मंगळवारी दुपारी ३ वाजता ताब्यात घेतले असल्याची माहिती पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली.

गौतम पाषाणकर हे 21 ऑक्टोबर रोजी नेहमीप्रमाणे ऑफिसच्या कामानिमित्त बाहेर पडले होते. पाषाणकर हे लोणी काळभोर येथील गॅस एजन्सीच्या ऑफिसमध्ये गेले. तेथून ते शिवाजीनगर येथील ऑफिसमध्ये आल्यावर एक बंद लिफाफा चालकाकडे दिला, आणि ते घरी देण्यास सांगितले. चालक लिफाफा देण्यासाठी घरी गेला. त्यानंतर पाषाणकर ऑफिसमधून बाहेर पडले आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या दिशेने चालत निघून गेले.गौतम पाषाणकर घरी न आल्याने कुटुंबीयांनी अखेर पोलीस स्थानकात धाव घेतली. तपास सुरू असताना चालकाकडे दिलेल्या लिफाफ्यात सुसाईट नोट असल्याचं आढळून आलं. मागील काही दिवसापासून व्यवसायात झालेल्या नुकसानामुळे आत्महत्येचं पाऊल उचलत असल्याचं त्यांनी लिहिलं होतं. यानंतर तपासाचा वेग वाढवण्यात आला.

अधिक वाचा  पुण्यामध्ये मिनी लॉकडाऊन:काय असणार निर्बंध?

गौतम पाषाणकर हे  भाड्याची एक गाडी करून ते कोल्हापूरला गेले होते. हे समजल्यावर पुणे पोलीस कोल्हापूरला पोहचले होते. तेथील तारा राणी चौकात ते कारमधून उतरल्याचे व एका हॉटेलमधून पार्सल घेतल्याचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले होते. त्यानंतर ते कोकणात गेल्याचे दिसून आले. मात्र, त्यानंतर त्यांचा शोध लागला नव्हता. जवळपास ३३ दिवसांनंतर पोलिसांना पाषाणकरांचा शोध लागला आहे.

 गुन्हे शाखेच्या युनिट १ चे पथक त्यांचा शोध घेत होते. पोलीस निरीक्षक सुनिल ताकवले यांना बातमीदारांकडून ते जयपूर येथे असल्याचे समजले. पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड व त्यांचे सहकारी तातडीने जयपूरला रवाना झाले. त्यांनी तेथील एका हॉटेलमध्ये जाऊन गौतम पाषाणकर यांना मंगळवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास आपल्या ताब्यात घेतले असल्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले.

अधिक वाचा  नववर्षाच्या पूर्वसंध्येला पुणे पाेलीसांकडून काेबिंग ऑपरेशन: 414 गुन्ह्यात 443 आराेपींना अटक

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love