पुणे- गेल्या आठ दिवसांपूर्वी सुसाइड नोट लिहून ठेऊन बेपत्ता झालेले पुण्यातील उद्योजक गौतम पाषाणकर यांनी घर का सोडले याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. पाषाणकर एका बड्या राजकीय नेत्याच्या जवळच्या व्यक्तीकडून दिल्या जाणाऱ्या त्रासामुळे घर सोडून गेल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे दिली आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.
मागील बुधवारी गौतम पाषाणकर अचानक बेपत्ता झाल्याची तक्रार यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे दिली होती . त्याचबरोबर पाषाणकर यांनी स्वतःच्या हाताने लिहिलेली तीन पानांची सुसाईड नोटही कुटुंबीयांनी पोलिसांकडे दिली होती. मात्र त्या सुसाईड नोटची तीन नाही तर चार पानं असून चौथ्या पानावर आर्थिक कारणांनी दिल्या जात असलेल्या त्रासामुळे आपण पुण्याच्या बाहेर निघून जात असल्याचं गौतम पाषाणकर यांनी लिहून ठेवलायचा दावा पाषाणकर यांचा मुलगा कपिल पाषाणकर यांनी केलाय . त्याचबरोबर या प्रकरणात पुणे पोलिसांवर दबाव असू शकतो असंही त्यांनी म्हटलं आसल्याचं एबीपी माझा या वाहिनीने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.
.