पुणे -पुणे शहराचे पाेलीस अधिकारी व कर्मचारी अवैध धद्यांवर कारवाई करत असताना युनिट चारचे वरिष्ठ पाेलीस निरीक्षक रजनीश निर्मल यांना बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, पाेलीसांनी गुटख्यातील हवाला रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी तीन काेटी 47 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून नऊ जणांना अटक करण्यात आल्याची माहिती पाेलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिलेली आहे.
गुन्हे शाखेचे पाेलीस उपआयुक्त बच्चन सिंग म्हणाले, खराडी येथे सुरेश अगरवाल नावाचे व्यक्तीचे जुमाताजी जनरल स्टाेअर्स नावाचे दुकान आहे. ताे त्याचे ओळखीचे लाेकांना चाेरुन, शासनाने प्रतिबंध केलेला गुटखा, पानमसाला, संगुधी, तंबाखू हे सेंट्रल व स्टेट एक्सार्इज कर चुकवून तस्करी केलेल्या आंतरराष्ट्रीय महागडया सिगरेट विक्री करत हाेता. त्यानुसार पाेलीसांनी सदर दुकानावर 16 नाेव्हेंबर राेजी छापा टाकून तीन लाख 92 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल, दाेन फाेर व्हील, एक टुव्हीलर आणि एक लाख 31 हजार रुपयांची राेकड असा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणात मुख्य आराेपी सुरेश अगरवाल (वय-54) व त्याच्या चार साथीदारांना अटक करण्यात आली.
सदर मुद्देमाल आराेपींनी काेठुन आणला याबाबत गुन्हयाचा आणखी तपास चालू असताना सदर मुद्देमाल ट्रान्ससपाेर्टचा व्यवसाय करणारा नवनाथ नामदेव काळभाेर हा पुरवत असल्याचे समजल्याने, त्याचा शाैध घेऊन त्यास अटक करण्यात आली. त्याच्याकडे अधिक चाैकशी केली असता त्याने सांगितले की, गुटख्याचे मुख्य विक्रेते दाेन व्यक्ती असून त्यांना हवाला मार्फत गुटखा विक्री घेण्यासाठी पैशांची देवाणघेवाण केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे परिमंडळ एकचे पाेलीस उपआयुक्त यांचे मार्गदर्शनाखाली पाच वेगवेगळया पाेलीस अधिकारी व कर्मचारी यांचे पथक तयार करुन दाेन डिसेंबर राेजी सकाळी सात ते रात्री दहा वाजेपर्यंत पुणे शहरात वेगवेगळया पाच ठिकाणी एकाचवेळी छापे टाकून तीन काेटी 52 लाख 74 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यात तीन काेटी 47 लाख 38 हजार रुपयांची राेख रक्कम, 9 माेबाईल, दाेन डीव्हीआर, दाेन पैसे माेजण्याचे मशीन व इतर वहया असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या छाप्या दरम्यान आणखी नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास सहाय्यक पाेलीस निरीक्षक संदीप जमदाडे करत आहे.