नदीपात्रालगत गोठ्यात बांधलेली 14 जनावरे नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने बुडून दगावली : वारजे भागातील घटना


पुणे(प्रतिनिधि)—पुण्यामध्ये कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक सोसायट्यांमध्ये आणि घरांमध्ये पानी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. रस्त्यांना नदीचे स्वरूप आले आहे. पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या चार धरणांच्या साखळी क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस सूर असल्याने खडकवासला धरणातून रात्रीतून अचानक पाण्याचा विसर्ग वाढवल्याने सोसायट्यांमध्ये पाणी शिरल्याने नागरिक अडकून पडले होते. दरम्यान, पुण्यातील वारजे भागात अचानक पाण्याचा विसर्ग वाढल्याने मुठा नदीला आलेल्या पुरामुळे एक दुर्दैवी घटना घडल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

रात्री अचानक पाऊस सुरू झाला. खडकवासला धरणातूनही जवळजवळ 40 क्युसेक्सने मुठा नदीच्या पात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे  नदीपात्रातील पाणी वाढले. दरम्यान, पुण्यातील वारजे भागातील  स्मशानभूमी परिसरातील नदीपात्रालगत गोठ्यात 14 जनावरे बांधली होती. पाण्याची पातळी वाढल्याने आणि गोठा नदी पात्रालगत असल्याने हा संपूर्ण गोठा पाण्याखाली गेला आणि या गोठ्यात बांधलेली 14 जनावरे पाण्यात बुडाल्याने दगावली आहेत. यात 11 गाई आहेत तर चार ते पाच जनावरे पाण्यात तोंड वर करून उभी राहिल्याने बचावले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love
अधिक वाचा  सत्तापक्षाच्या मनात पाप नसेल तर ‘आरक्षण ठरावावर’ विरोधकांना बोलावयास देऊन चर्चा का घडवली नाही? - गोपळदादा तिवारी