रस्त्यावर झोपलेल्या उसतोडणी कामगाराच्या एका वर्षाच्या मुलाचे अपहरण

क्राईम
Spread the love

पुणे—पुण्यातील हडपसर भागातून चार महिन्यांच्या बाळाचे अपहरण झाल्याची घटना ताजी असताना पुन्हा हडपसर भागातील गाडीतळ येथून झोपलेल्या उसतोडणी कामगाराच्या एका वर्षाच्या मुलाचे अपहरण झाले आहे. हडपसर पोलीस ठाण्यात यासंबंधी अज्ञात आरोपीविरुध्द अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, हडपसर भागात होणाऱ्या लहान बालकांच्या अपहरणाच्या प्रकारांमुळे या भागात घबराट पसरली आहे.

 कार्तिक नीलेश काळे (वय एक वर्ष, हडपसर उड्डाणपुलाखाली, मूळ गाव बाभळगाव, इंदापूर) असे अपहरण झालेल्या मुलाचे नाव आहे. शर्मिला नीलेश काळे (वय २२, रा. हडपसर उड्डाणपुलाखाली, हडपसर) असे बाळाच्या आईचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काळे कुटुंब इंदापूर येथील उसतोडणीचे काम संपवून हडपसर येथील गाडीतळ येथे पोट भरण्यासाठी आले आहे. त्यांना घराचे छप्पर नसल्याने त्यांनी हडपसर उड्डाणपुलाखालील गाडीतळ येथील बीआरटी मार्गाच्या मोकळ्या जागेवर त्यांनी आपला संसार थाटला. ते झोपलेले असताना सकाळी उठल्यानंतर त्यांना त्यांचे मूळ कार्तिक हे जवळ झोपलेले आढळले नाही. त्यामुळे त्यांनी बाळाचा शोध घेतला. सोमवारी सकाळी हे घटना उघडकीस आली. बाळाचा शोध घेऊनही ते सापडले नाही म्हणून काळे दाम्पत्याने पोलिसांकडे यासंदर्भात तक्रार नोंदवली आहे. रंगाने सावळा, अंगामध्ये लाल रंगाचे जर्किन व लाल टोपी, डाव्या कानात चांदीची बाळी, गळ्यात लाल रंगाचा दोरा, केस कापलेले, व अंगावरती खरुज झाल्याने जखमेचे व्रण आहेत असे या बाळाचे वर्णन पोलिसांनी दिले आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *