पुणे – पुणे पदवीधर मतदार संघातील महाविकास आघाडी, भाजप आणि मनसेच्या उमेदवारांनी निवडणूक आयोगाला खोटी माहिती दिल्याची तक्रार पुण्यातील वकील अभिषेक हरिदास यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.
पुणे पदवीधर मतदार संघातील प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड, भाजपचे संग्राम देशमुख आणि मनसेच्या रुपाली पाटील यांच्यात खरी लढत होणार आहे. मात्र, प्रचारात सर्वांनी आघाडी घेतली असताना निवडणूक आयोगाकडे ही तक्रार केल्याने निवडणूक आयोग यावर काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पुण्यातील वकील अभिषेक हरिदास यांनी ही तक्रार केली आहे. या तक्रारीत या तिन्ही उमेदवारांनी निवडणूक आयोगाला खोटी माहिती दिल्याचा गंभीर आरोप केला आहे. या तिन्ही उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज भरताना माहितीपत्रात खोटी माहिती दिल्याचा आरोप हरिदास यांनी केला आहे.