क्युरिऑसिटी स्ट्रीमचे अनेक पुरस्कार विजेते माहितीपट आता टाटा स्काय बिंजमार्फत उपलब्ध होणार

पुणे-मुंबई
Spread the love

मुंबई -जगातील आघाडीची माहितीपट निर्माती क्युरिऑसिटी स्ट्रीम आणि भारतातील सर्वात मोठी पे टीव्ही (डायरेक्ट टु होम) कंपनी टाटा स्काय यांनी माहितीपट आणि माहिती मालिका असे हजारो तासांचे मनोरंजन टाटा स्काय प्रेक्षकांसाठी उपलब्ध देण्यासाठी एक करार केला आहे. क्युरिऑसिटी स्ट्रीम चे अनेक पुरस्कार विजेते माहितीपट आता टाटा स्काय बिंज या ओव्हर द टॉप (ओटीटी ) सेवेमार्फत उपलब्ध होणार आहेत. टाटा स्काय बिंज चा स्मार्ट सेट टॉप बॉक्स आणि टाटा स्काय साठीची अमेझॉन फायर स्टिक यावर हे माहितीपट पाहता येतील.

क्युरिऑसिटी स्ट्रीम चे कर्यक्रम टाटा स्काय च्या डीटीएच सभासदांना लाइव्ह आणि टाटा स्काय मोबाइल ऍपवर ‘कॅच अप ऑन द गो’ मध्ये पाहता येतील. या कराराचा फायदा मिळवत टाटा स्काय ग्राहक डीप ओशन, ड्रॅगन्स अँड डॅमसेल्स, स्टीव्हन हॉकिंग्ज फेव्हरिट प्लेसेस, मुंबई रेल्वे, अमेझिंग डिनोवर्ल्ड आणि एज ऑफ बिग कॅट्स यांसह अनेक माहितीपट पाहता येतील.

 टाटा स्काय च्या मुख्य कमर्शिअल आणि कन्टेन्ट अधिकारी पल्लवी पुरी म्हणाल्या, क्युरिऑसिटी स्ट्रीम चे कार्यक्रम जगभरात खास म्हणून ओळखले जातात. आमच्या  ओटीटी  आणि डीटीएच ग्राहकांसाठी विज्ञान, इतिहास, अवकाशविज्ञान, तंत्रज्ञान, आणि इतर अनेक क्षेत्रांबद्दल मूल्यवान माहिती देणारे मस्ट सी  कार्यक्रम उपलब्ध करून देण्याची आमची इच्छा होती. या दर्जेदार संग्रहाची भर आमच्या माहिती / मनोरंजन साठ्यात पडली याचा आम्हाला अभिमान आहे. 

क्युरिऑसिटी स्ट्रीम आणि टाटा स्काय यांच्या व्यावसायिक विचारसरणीत सामायिक धागा म्हणजे उच्च दर्जाचे माहिती / मनोरंजन प्रेक्षकांपर्यंत पोचवण्याचा दृष्टिकोन. विलक्षण व्यक्ती, स्थळे आणि कथा यांची अनुभूती मिळवावी असे आमच्या प्रेक्षकांना जेव्हा जेव्हा वाटेल तेव्हा ती उपलब्ध झाली पाहिजे हे त्याचे गमक आहे, असे क्युरिऑसिटी स्ट्रीम चे व्यवस्थापकीय संचालक बकोरी डेव्हिस म्हणाले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *