Sidhu Moose Wala : आज भावाच्या खुनाचा बदला घेतला आहे.. ही तर सुरुवात आहे ..गॅंगवार भडकणार?

क्राईम राष्ट्रीय
Spread the love

चंदीगढ- प्रसिद्ध पंजाबी गायक, रॅपर आणि काँग्रेस नेते सिद्धू मुसेवाला याच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार  टोळीने स्वीकारली आहे. दोघांनी फेसबुकवर पोस्ट करून सिद्धू मुसेवाला याच्या हत्येचे कारण सांगितले आहे. लॉरेन्स गँगने, ‘राम राम भाई सबको… मी आणि माझा भाऊ गोल्डी ब्रार  आज सिद्धू मुसेवालाच्या हत्येची जबाबदारी घेतो आहे.  आज लोक काहीही म्हणोत पण आमचा भाऊ विकी मिड्डूखेडा याच्या हत्येला त्याने मदत केली होती. आज आम्ही आमच्या भावाच्या हत्येच बदला घेतला आहे, अशी फेसबूकवर पोस्ट केली आहे.

मी सिद्धूला जयपूरहून फोन करून सांगितले होते की तू चूक केली आहेस. त्यावेळी तो मला म्हणाला होता की, मला कोणाचीही पर्वा नाही, जे करायचे ते कर. मी माझे हत्यार लोड करून ठेवतो. आणि आज आम्ही आमचा भाऊ विकीला न्याय मिळवून दिला आहे. ही तर सुरुवात आहे… या हत्येमध्ये आणखी कोणाचा हात आहे, त्यांनी तयार राहावे असे आव्हान त्यांनी दिले आहे.  दरम्यान, एके-47 मधून गोळीबार झाला असे मीडिया जे म्हणत आहे ते पूर्णपणे चुकीचे आहे. खोट्या बातम्या चालवू नका. आज आम्ही सर्व भ्रम दूर केले आहे असेही शेवटी त्यांनी म्हटले आहे.

दोन दिवसात बदला घेऊ- बंबीहा टोळीची धमकी

दुसरीकडे गँगस्टर दविंदर बंबीहा टोळीनेही सोशल मीडियावर पोस्ट टाकून लॉरेन्स बिश्नोई टोळीला खुले आव्हान दिले आहे. दोन दिवसांत सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येचा बदला घेणार असल्याचे टोळीने म्हटले आहे. तो निर्दोष होता. त्याचा कोणत्याही गुंड टोळीशी संबंध नव्हता, असे त्यांनी म्हटले आहे.

मानसामध्ये केली होती सिद्धू मुसेवालाची हत्या 

प्रसिद्ध पंजाबी गायक, रॅपर आणि काँग्रेस नेते सिद्धू मुसेवाला यांची रविवारी संध्याकाळी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. हल्लेखोर दोन कारमधून आले होते. सिद्धू दोन साथीदारांसह आपल्या थार कारमधून मानसाच्या जवाहरके गावातून खारा-बरनाळा गावात जात असताना ही हत्या करण्यात आली. या हल्ल्यात त्याचे दोन साथीदार जखमी झाले असून, त्यांना पटियालाच्या राजिंदरा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सिद्धू मुसेवाला यांच्या सुरक्षेसाठी चार पोलिस बंदुकधारी होते. यातील दोन सुरक्षा कर्मचाऱ्यांना पंजाब सरकारने परत बोलावले होते.

घटनेच्या वेळी दोन्ही सुरक्षा कर्मचारी एकत्र नव्हते. सिद्धू नेहमी बुलेटप्रूफ वाहन चालवत असत, मात्र रविवारी संध्याकाळी ते स्वत:च थार चालवत होते. मात्र, थारच्या काचा बुलेटप्रूफ होत्या. कॅनडास्थित गँगस्टर गोल्डी ब्रार याने हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. तो उत्तर भारतातील प्रसिद्ध गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या जवळचा आहे. लॉरेन्स सध्या राजस्थानमधील अजमेर तुरुंगात आहे. लॉरेन्सचा जवळचा सहकारी विकी मिड्दुखेडा याची काही काळापूर्वी हत्या झाली होती. या हत्याकांडात सहभागी असलेल्या शूटर्सना मूसेवालाच्या व्यवस्थापकाने आश्रय दिला होता.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *