महिलांच्या वेदना पुरुष समजून घेत नाहीत, ही शोकांतिका

पुणे-मुंबई महाराष्ट्र
Spread the love

पुणे- आयुष्यात त्यागाशिवाय काहीही शक्य नाही. प्रत्येक पुरुषांच्या यशामागे महिलांनी कुटुंबासाठी केलेला त्याग असतो. पण महिलांच्या वेदना पुरुष समजून घेत नाहीत, ही निंदनीय बाब आहे. त्यामुळे महिलांचा सन्मान करायला शिकले पाहिजे, अशा शब्दात ह.भ.प. पंकज महाराज गावडे यांनी विचार व्यक्त केले.

तळेगाव दाभाडे येथील श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळ, समाजप्रेमी आप्पा प्रतिष्ठान व रोटरी क्लब ऑफ तळेगाव एम.आय.डी.सी. यांच्या संयुक्तपणे महिला दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या  पुरस्कार वितरण समारंभात ह.भ.प. पंकज महाराज गावडे बोलत होते. कार्यक्रमात सारिका सुनील शेळके यांना राजमाता जिजाऊ समाजरत्न महिला पुरस्कार,

सेवाधाम ग्रंथालय व वाचनालयाच्या सचिव डॉ. वर्षा वाढोकर यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले समाजरत्न महिला पुरस्कार, शांताबाई मोहनराव काकडे यांना ‘शांताई आदर्श माता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच शैक्षणिक क्षेत्रात कर्तृत्व साध्य करणार्‍या कुसुम शिवाजी वाळुंज, सहकार क्षेत्रात शबनम अमिन खान, साहित्यिक क्षेत्रात ज्योती नागराज मुंडर्गी, वैद्यकीय क्षेत्रात शोभा पोपट कदम, कृषी व उद्योग क्षेत्रात सुरेखा मनोहर काशिद, सांस्कृतिक क्षेत्रात अंजली विवेक सहस्रबुद्धे, सांप्रदायिक क्षेत्रात चांगुणाबाई जगन्नाथ भेगडे, उत्कृष्ट महिला बचत गट म्हणून माळवाडीच्या सावित्रीबाई फुले महिला बचत गटाला गौरविण्यात आले.

माजी आमदार दिगंबर भेगडे, आमदार सुनिल शेळके, मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेश खांडगे, श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक संतोष खांडगे, डॉ. कृष्णकांत वाढोकर, गणेश काकडे, बाळासाहेब शिंदे, दादासाहेब उऱ्हे, सुमती निलवे, रजनीगंधा खांडगे, वसंत खांडगे, किरण काकडे, सुदाम दाभाडे, मच्छिंद्र घोजगे, मिलिंद शेलार, विल्सेंट सालेर, प्रविण भोसले, सचिन कोळवणकर, पांडुरंग पोटे, सुनिल खोल्लम, विलास भेगडे, विलास टकले, सुवर्णा मते, ज्योती नवघणे, सुलोचना खांडगे, डाॅ. सत्यजित वाढोकर, रवींद्र दंडेलवाल, दामोदर शिंदे, बबनराव ढोरे, राजेंद्र काळोखे, सोनबा गोपाळे, संदीप पानसरे आदी मान्यवर उपस्थित होते.

ह.भ.प. पंकज महाराज गावडे म्हणाले, की आई गेल्यानंतर आईची महती कळते. म्हणून आई जपली पाहिजे. आईवडील गेल्यानंतर मुलीचे माहेर संपते, हे वास्तव व दुर्दैवी आहे. पुरुष घडत असताना स्त्रीची प्रतिमा झाकोळली जाऊ नये. कारण स्त्री शिवाय पुरुषाला कर्तृत्वाला अर्थ नाही. संपूर्ण स्वराज्य निर्माण करण्याची ताकद स्त्री मध्ये आहे, हे विसरून चालणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष खांडगे यांनी केले. सूत्रसंचालन कुसुम वाळुंज, लक्ष्मण मखर व अनिल धर्माधिकारी यांनी, तर सुमती निलवे यांनी आभार मानले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *