​एशिया इकोनॉमिक डायलॉग 2023 चे 23 ते 25 फेब्रुवारी दरम्यान आयोजन

पुणे-मुंबई
Spread the love

पुणे : पुणे इंटरनॅशनल सेंटरच्या (पीआयसी) पॉलिसी रिसर्च थिंक टँक आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालय (एमईए) यांच्या संयुक्त विद्यमाने एशिया इकोनॉमिक डायलॉग (एईडी) 2023 या भू-अर्थशास्त्र परिषदेचे आयोजन पुण्यात 23 ते 25 फेब्रुवारी 2023 दरम्यान करण्यात आले आहे. महामारीनंतर जगावर परिणाम करणाऱ्या आशिया आणि युरोपमधील भू-राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर एईडी 2023 ची संकल्पना एशिया अ‍ॅन्ड द इर्मजिंग वर्ल्ड ऑर्डर ही आहे.

ही परिषद एक प्रमुख आंतरराष्ट्रीय कार्यक्रम असून यामध्ये मंत्री,धोरणकर्ते,औद्योगिक नेतृत्व,विविध क्षेत्रातील तज्ञ जागतिक व्यापार आणि अर्थतज्ञ यांचा सहभाग असतो.या परिषदेत ब्राझील,युएसए,तैवान,युके,साऊथ आफ्रिका,भुतान,मालदिव,सिंगापूर आणि मेक्सिकोसह 12 देशांमधील 44 वक्ते सहभागी होणार आहेत.भारताचे जी20चे अध्यक्षपद हा एक चर्चेचा भाग असेल,ज्यामध्ये जी20 अध्यक्षपदासाठी भारताचा दृष्टीकोन आणि ग्लोबल साऊथ ही संकल्पना  जी20 कार्यक्रमाला  कसा आकार देईल ही दोन महत्त्वाची सत्रे आहेत.या सत्रात प्रख्यात अर्थतज्ञ व गोखले इन्स्टिट्युट ऑफ पॉलिटिक्स अ‍ॅन्ड इकोनॉमिक्सचे कुलगुरू डॉ.अजित रानडे हे भारताचे प्रमुख जी20 समन्वयक हर्षवर्धन श्रींगला यांच्याशी संवाद साधतील.

हर्षवर्धन श्रींगला यांसह मुंबईतील ब्राझीलचे कौन्सुल जनरल जो डे मेंडाँको लिमा नेटो आणि मुंबईतील दक्षिण आफ्रिकेचे कॉन्सुल जनरल अँड्रिया क्युन हे चर्चासत्रात सहभागी होतील.डॉ.रानडे या चर्चासत्राचे अध्यक्ष असतील.

एशिया इकोनॉमिक डायलॉग उद्घाटन सत्र 23 फेब्रुवारी 2023 रोजी दुपारी 4 वाजता आयोजित करण्यात आले असून जेष्ठ शास्त्रज्ञ आणि पीआयसीचे अध्यक्ष डॉ.रघुनाथ माशेलकर हे उपस्थितांचे स्वागत करतील.या सत्रात भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ.एस जयशंकर,भूतानचे अर्थमंत्री लिओंपो नामगे शेरीन आणि मालदिवचे अर्थमंत्री इब्राहिम अमीर सहभागी होतील.

या सत्राचे आणखी एक वैशिष्टय म्हणजे इन्फोसिसचे संस्थापक एन.आर.नारायणमूर्ती यांच्याशी टेक्नोलॉजी अ‍ॅन्ड टॅलेंट फॉर ग्लोबल सक्सेस या विषयावर फायर साईड चॅट संवाद .पीआयसीचे विश्वस्त व 5एफ वर्ल्ड चे कार्यकारी अध्यक्ष व संस्थापक डॉ.गणेश नटराजन हे त्यांच्याशी संवाद साधतील.

एशिया इकोनॉमिक डायलॉगची सांगता 25 फेब्रुवारी 2023 रोजी होणार असून केंद्रिय वाणिज्य व उद्योगमंत्री पीयुष गोयल यांचे या सत्रात प्रमुख भाषण होईल.या सत्राच्या अध्यक्षस्थानी सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू डॉ.विद्या येरवडेकर असतील.

या परिषदेत तीन दिवसांत 11 सत्रे असून यामध्ये ग्लोबल ग्रोथ प्रॉस्पेक्टस,मेकिंग सेमीकंडक्टर सप्लाय चेन्स रिझिलियंट,एफटीए – द वे फारॅवर्ड आणि मेटाव्हर्स अंडरस्टँडिंग द फ्युचर याचा समावेश असेल.

पायोनियरींग सोशली रिस्पॉन्सिबल बिझनेस इन इर्मजिंग वर्ल्ड ऑर्डर या सत्राचे आयोजन कॉन्फिडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री यांच्या तर्फेे केले गेले असून टाटा सन्स प्रा.लि.च्या इन्फ्रास्ट्रक्चर,डिफेन्स अ‍ॅन्ड एरोस्पेस आणि ग्लोबल कॉर्पोरेट अफेअर्सचे अध्यक्ष बनमाली अग्रवाला या सत्राच्या अध्यक्षस्थानी असतील.या सत्रामध्ये फोर्ब्स मार्शलचे सहअध्यक्ष फरहाद फोर्ब्स,डिपॉल विद्यापीठ युएसएमधील प्राध्यापक आणि पँडेमिक मेडिसिन या पुरस्कार प्राप्त पुस्तकाचे लेखक डॉ.कॅथरिन इबाटा – आरेन्स , टीटी गॅसकेटस् फिनलँडचे मुख्य कार्यकारी अधिकारी व संचालक मंडळाचे सदस्य अलेक्सी आरपीयानेन,अर्थमंत्रालयातील माजी सचिव व टीव्हीएस मोटर कंपनीचे संचालक आर. गोपालन हे सहभागी होतील.

रेव्हेल्युशनायझिंग द इकोनॉमी : इंटिग्रेटिंग पेमेंट सिस्टिम्स अ‍ॅन्ड डिजिटायझिंग करन्सीज या सत्राचे आयोजन द एशिया सोसायटी इंडिया सेंटर तर्फे केले गेले असून रिलस्कोअरचे सीटीओ आणि सहसंस्थापक डॉ.नवीन काब्रा हे या सत्राच्या अध्यक्षस्थानी असतील.या सत्रात पॉलिसी 4.0 च्या मुख्य कार्यकारी अधिकारी तन्वी रत्ना,नॅशनल पेमेंटस कॉर्पोरेशन इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप आसबे,परराष्ट्र मंत्रालयातील विशेष सचिव प्रभात कुमार आणि रिझाल कमर्शियल बँकींग कॉर्पोरेशन (आरसीबीसी),फिलिपिन्सचे कार्यकारी उपाध्यक्ष व चीफ इनोव्हेशन अ‍ॅन्ड इनक्लुजन ऑफिसर लिटो विला निवा सहभागी होतील.

 हवामान बदल या जागतिकदृष्ट्या आव्हानात्मक विषयावर क्लायमेट चेंज : रिअल थ्रेट आणि मिटिंग क्लायमेट टार्गेटस : द रोड अहेड या दोन सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. दुसर्‍या सत्रात ऑटोमोटिव्ह स्टँपिंग्स अ‍ॅन्ड असेंब्लीज लि.चे अध्यक्ष प्रदीप भार्गवा हे अध्यक्षस्थानी असतील.या सत्रात ग्लोबल ग्रीन ग्रोथ इन्स्टिट्युटच्या भारतातील प्रतिनिधी नेहा मुदलीयार,आयएफसी इंडियाचे कंट्री मॅनेजर वेंडी वेरनर आणि वर्ल्ड बँकचे प्रोग्राम लीडर,इन्फ्रास्ट्रक्चर व सिनिअर एनर्जी स्पेशालिस्ट डॉ.अशोक सरकार सहभागी होतील.

 या सत्रातील इतर प्रमुख वक्त्यांमध्ये एक्सकेडीआरचे सहसंस्थापक प्रा.अजय शहा,जेएच कन्सल्टींग युएसए चे संचालक जोशुआ फेलमान,ब्राझीलच्या सीईबीआरआयच्या आंतरराष्ट्रीय सल्लागार मंडळाचे सदस्य अ‍ॅम्बेसिडर मॅक्रॉस कारामुरू,आदित्य बिर्ला ग्रुपमधील चीफ इमोनॉमिस्ट डॉ.ईला पटनायक,जागतिक व्यापार संघटनेसाठी (डब्ल्यूटीओ) भारताचे माजी प्रतिनिधी अ‍ॅम्बेसिडर जेएस दीपक,अ‍ॅन्स्ली इंटरनॅशनल कन्सल्टंटस मेक्सिकोचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी जुआन कार्लोस बेकर पीनेडा,माजी केंद्रिय वाणिज्य सचिव अनुप वाधवान,इंडियन इन्स्टिट्युट ऑफ फॉरेन ट्रेडच्या सेंटर फॉर डब्ल्यूटीओ स्टडीजचे माजी प्रमुख प्रा.अभिजित दास,रेलिस्कोअरचे सहसंस्थापक अमित परांजपे,सेमी-युएसएचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी अजित मनोचा,डिजीटाईम्स तैवानचे संस्थापक व अध्यक्ष कॉली ह्वाँग आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयातील माजी सचिव अजय प्रकाश सॉहनी यांचा समावेश आहे.

 मेटाव्हर्स : अंडरस्टँडिंग द फ्युचर या सत्राच्या अध्यक्षस्थानी डॉ.गणेश नटराजन असतील व यामध्ये जेट सिंथेसिस इंडियाचे संस्थापक राजन नवानी,मॅकेंझी अ‍ॅन्ड कंपनी सिंगापूरचे भागीदार चाऊ एनग्युयेन आणि ग्राफिटी आयओ चे प्रमुख सल्लागार अक्षय गौतम सहभागी होतील.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *