gtag('js', new Date());
पुणे : भाजयुमोने 'जिम खोलो आंदोलनाची' हाक दिली. आंदोलनाची माहिती मिळताच राज्य सरकार सतर्क झाल्याचे दिसून आले. अनेक ठिकाणी भाजयुमो कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशन मध्ये जाऊन आंदोलनाच्या घेतलेल्या परवानग्या तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून दिवसभर चालविलेली मोहीम हे सर्व विषय राज्य सरकार दरबारी पोहचले म्हणून भाजयुमोच्या आक्रमक पवित्र्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना घाईघाईने व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करत जिम...
मुंबई- भाजपचे नेते एकनाथ खडसे यांच्या भाजपला  सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्यावरून दररोज नवनवीन चर्चा राजकीय वर्तुळात चर्चिल्या जात आहेत. घटस्थापनेच्या मुहूर्तावर खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार अशी चर्चा होती. परंतु, तो फुसका बार ठरला. आता एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम करीत राजीनामा दिला  असल्याच्या चर्चा सुरु आहेत. मात्र, खडसेंनी राजीनामा दिलेला नाही. राजीनामा प्रदेशाध्यक्षांकडे द्यायचा असतो,...
Young IT engineer commits suicide by jumping from 21st floor
पुणे-—पिंपरी-चिंचवड मधील महात्मा फुले नगर येथील एका कामगाराचा हृदयरोगाने मृत्यू झाला परंतु कोरोंनाच्या भीतीने हा मृतदेह तब्बल सहा तास तसाच राहिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अखेर या भागातील सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र ननावरे यांनी पुढे येत त्यांच्या सहकाऱ्यांसाह  तो मृतदेह रुग्णालयात नेला त्याच्यावर अंत्यसंस्कार केले. या असंवेदनशीलते मुळे माणुसकी  संपली आहे की काय असा प्रश्न उपस्थित...
पुणे :विविध गुन्ह्यांमध्ये आरोपी असलेला सराई  गुन्हेगार तब्बल 13 वर्षे पोलिस असल्याचे बनावट ओळखपत्र बनवून राजरोसपणे वावरत आणि त्याचा उपयोग करीत असल्याचा धक्कादायक प्रकार  समोर आला आहे.  इम्तियाज इद्रीस मेमन (रा.तिरुपती सोसायटी, हडपसर) असे या गुन्हेगाराचे नाव असून त्याच्यावर दंगल, जाळपोळ, खंडणी मागणे असे गुन्हे आहेत. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली...
पुणे(प्रतिनिधि)—पुण्यामध्ये सुरू करण्यात आलेले जंबो हॉस्पिटल सुरुवातीपासून कुठल्या ना कुठल्या कारणाने चर्चेत आहे.हॉस्पिटल सुरू करण्यात आले तेव्हा येथील ढिसाळ व्यवस्थेमुळे मोठा गोंधळ आणि वाद निर्माण झाला होता. आता येथे सेवा देणारे डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी यांनी आपले थकलेले वेतन मिळावे यासाठी शनिवारी सकाळी आंदोलन केले. अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर ही आंदोलन मागे घेण्यात आले.
पुणे-चतुःश्रृंगी देवीच्या मंदिरात नवरात्रौत्सवानिमित्त आज सकाळी ९ वाजता देवीचा अभिषेक, षोडशोपचार पद्धतीने महापूजा व महावस्त्र अर्पण करून पारंपरिक पद्धतीने घटस्थापना करण्यात आली. विश्‍वस्त नरेंद्र अनगळ यांच्या हस्ते सर्व धार्मिक विधी करण्यात आले. नारायणशास्त्री कानडे गुरुजी आणि श्रीरामशास्त्री कानडे गुरुजी पौरोहित्य केले. अध्यक्ष किरण अनगळ आणि देवेंद्र अनगळ यांची प्रमुख उपस्थिती होती.शासनाने जाहीर केलेल्या सर्व नियमांचे पालन...