पुणे–बनावट केस हिस्ट्रीज तयार करुन विद्यार्थ्यांच्या गुणांचं पुनर्मुल्यांकन गुणांमध्ये फेरफार केल्याचा प्रकार पुण्यातील सिम्बॉयसिस महाविद्यालयात (Symbiosis College)उघडकीस आला आहे. या प्रकरणी सायबर पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संदिप हेंगळे आणि सुमित कुमार अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. विद्यार्थ्यांचे गुण अनधिकृतरित्या वाढवल्याची माहिती चौकशी दरम्यान समोर आली असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. पुण्यातील मॉडेल कॉलनीतील सिम्बॉयसिस कॉलेजमध्ये हि घटना घडली.
याबाबत सविस्तर महिती अशी संदिप हेंगळे हे सिम्बॉयसिस ओपन एज्युकेशन सोसायटीचे मुल्यमापन विभागाचे प्रमुख अधिकारी आहेत. त्यांनी स्वत:च्या अर्थिक फायद्याकरता बनावट केस हिस्ट्रीज तयार करुन सुमित कुमार या विद्यार्थाकडून पैसे घेतले आणि त्याचे गुण वाढवले, असा आरोप आहे.
सिम्बॉयसिस कॉलेजमधील दुरुस्थ शिक्षण विभागात विद्यार्थ्यांच्या गुणांचं पुनर्मुल्यमापन करुन विद्यार्थ्यांचे गुण वाढवल्याचा प्रकार घडला आहे. पुनर्मुल्यांकन करुन 187 विद्यार्थ्यांचे गुण वाढवल्याचा प्रकार घडला आहे.याबाबत सिम्बॉयसिस संस्थेच्या डिस्टन्स लर्निंगचे रजिस्टार नामदेव आनंद कुंभार यांनी सायबर पालिसांकडे तक्रार दिली आहे.