gtag('js', new Date());
पुणे-अभिनेत्री तेजस्विनी पंडितचे नवरात्री स्पेशल फोटोशूट नेहमीच तिच्या चाहत्यांमध्ये आणि सिनेसृष्टीमध्ये चर्चेचा विषय असतो.  दरवर्षी वैविध्यपूर्ण कल्पनांव्दारे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये तेजस्विनी आपले फोटोशूट घेऊन येते. यात कधी स्त्रीशक्तीला सलाम असतो, तर कधी अदिशक्तीला आदरांजली असते तर कधी सद्यस्थितीवर केलेले भाष्य असते. यंदा तेजस्विनी आपल्या फोटोशूटमधून कोरोनायोध्द्यांना सलाम करत आहे.नवरात्रीच्या पहिल्या दिवशी...
पुणे - देशात शब्द आणि संकल्पना मांडल्यामुळे अनेक कार्यकर्त्यांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे लेखणी सत्ताधाऱ्यांच्या तलवारी बरोबर कशी लढू शकते असा प्रश्न निर्माण झाला आहे, अशी टीका काँग्रेसचे नेते शशी थरुर यांनी केली आहे.सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या फेस्टिवल निमित्त आयोजित कार्यक्रमात शशी थरूर बोलत होते. शशी थरूर म्हणाले, मी शाळेत असताना लेखणीची धार तलवारीपेक्षा अधिक असते,...
मुंबई- घटस्थापनेच्या मुहूर्तावर भाजपचे नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार, त्यांना विधान परिषदेतून आमदारकी देऊन कृषी खाते देणार अशा प्रकारची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. सुत्रांकडूनही अशी माहिती मिळाली होती. मात्र, खडसेंचा राष्ट्रवादीतील  प्रवेश म्हणजे ‘बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात’ ठरला आहे.खडसे यांना पक्षात डावलले जात असल्यामुळे त्यांनीच...
समाजात महिलांच्या रूपाने अनेक देवीरुपी स्त्रिया आपले कर्तृत्व सिद्ध करत आहे. भारतीय संस्कृतीत देवींच्या धाडसी आणि पराक्रमी लढायांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.  देवलोकात देवदेवतांना अनेक संकटांचा सामना करून आपले स्थान निर्माण करावे लागते. भूलोकात संकटांची रूपं बदलली असली तरी संघर्ष तोच आहे. क्षेत्र कोणतेही असो, स्त्रियांच्या स्वभावात असलेला सृजनशीलतेचा आणि समर्पणाचा गुणधर्म त्यांना नेहमी अव्वल स्थान प्राप्त...
पुणे- पिंपरी - चिंचवड महानगरपालिकेला औद्योगिक परिसराचा विकास करण्यास येत नसेल तर औद्योगिक परिसर एमआयडीसी विभागाला  हस्तांतरीत करावा अशी मागणी फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांनी केली आहे.महाराष्ट्र सरकार एमआयडीसी परिसर निर्मिती करते परंतु त्याच्या मूलभूत सुविधांकडे अजिबात लक्ष देत नसल्याचा आरोप भोर यांनी केला....
पुणे : "उद्योग आणि शिक्षणसंस्थांमधील दरीविषयी नेहमी बोलले जाते. पण अलीकडच्या काळात ही दरी दूर करण्यासाठी औद्योगिक संस्था आणि शिक्षणसंस्था एकत्रित येत आहेत. उद्योगांना आवश्यक आणि समाजाभिमुख संशोधनावर शिक्षण संस्थांनी भर देण्याची आवश्यकता आहे. तसेच अशा संशोधनांना व्यवसायात रूपांतरित करण्याची गरज असून, त्यासाठी एकमेकांतील सामंजस्य करार उपयुक्त ठरतील," असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ....