gtag('js', new Date());
पुणे--'कोरोना'चा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी मानाचे गणपती वा अन्य कुठल्याही गणपतीच्या दर्शनासाठी कोणालाही परवानगी देता येणार नाही असे स्पष्ट करीत याची पोलीस विभागाने दक्षता घेण्याची सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.पुण्यातील विधानभवन सभागृहात उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्ह्यातील 'कोविड व्यवस्थापन व नियोजना'बाबत बैठक झाली. यावेळी ते...
नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)- भारत आणि चीनमध्ये सुरु असलेला सीमावाद लष्करी पातळीवरील अधिकाऱ्यांच्या चर्चेच्या अनेक फेऱ्या होऊनही अद्याप पूर्व लडाखमध्ये तणाव निवळलेला नाही. उलट चीनची कारस्थाने सुरूच असून भारतीय एजन्सीज प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) चिनी हवाई दलाच्या कामांवर बारकाईने नजर ठेवून आहेत. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला उत्तर देण्यासाठी भारतीय सैन्य सज्ज आहे. सरकारी सूत्रांनी...
पुणे-- सुशांतसिंह हा सेलेब्रेटी होता त्यामुळे त्याच्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे दिला आणि आम्ही सामान्य नागरिक आहोत, आमच्या प्रकरणाचा राजकीय फायदा नसल्याने आमच्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे दिला जात नाही का असा उद्विग्न सवाल पुण्यातील एका सामान्य कुटुंबातील आयुर्वेद डॉक्टर चैत्राली कुलकर्णी हिच्या चार वर्षांपूर्वी झालेल्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी तिच्या पालकांनी केला आहे. कॉलेजच्या प्रमुखांचे राजकीय लागेबांधे आहेत....
पुणे(प्रतिनिधी)— कोरोनाची पार्श्वभूमी आणि त्यामुळे विद्यार्थ्यांवर ओढवलेले आर्थिक संकट आणि विद्यापीठ प्रशासनाकडून चाललेला हलगर्जीपणा यामुळे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले.   संतप्त विद्यार्थ्यांनी आज विद्यापीठाचे कुलगुरू नितीन करमळकर यांना घेराव घातला.अंतिम वर्ष वगळता ज्या वर्षाच्या परीक्षा झाल्या नाहीत अशा सर्व...
पुणे— पार्थ पवार यांना लोकसभेला उमेदवारी देताना त्यांची किंमत किती, मॅच्युरिटी किती याची माहिती होती, मग त्यावेळी त्यांना अशीच उमेदवारी दिली का? असा टोला भाजपचे खासदार गिरीश बापट यांनी लगावला आहे. राजकीय जीवनात अनेकांना आपली मतं व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य आहे. पार्थ पवार तर पवार कुटुंबातील आहेत. त्यांना वाटलं असेल आपण काही सत्य बाहेर काढावे, म्हणून ते...
मुंबई- सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी ‘सत्यमेव जयते’ असे ट्वीट केल्याने पुन्हा राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आले आहे.पार्थ पवार यांनी अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या भूमिपूजनाच्यावेळी जाहीरपणे समर्थन करत शुभेच्छा...