मुख्य पृष्ठ ब्लॉग
महत्वाच्या बातम्या
राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष एक नाहीत; शिवसेनेच्या सत्तासंघर्षात कपिल सिब्बल यांचा सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद
News24Pune -0
नवी दिल्ली -शिवसेनेच्या अंतर्गत फुटीनंतर निर्माण झालेल्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी अत्यंत सविस्तर आणि आक्रमक युक्तिवाद केला असून, "राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष यांना एकाच पारड्यात तोलता येणार नाही," हा त्यांच्या मांडणीचा मुख्य गाभा ठरला आहे. सिब्बल यांनी स्पष्ट केले की, एखादा गट केवळ विधिमंडळातील बहुमताच्या जोरावर स्वतःला संपूर्ण 'राजकीय पक्ष' म्हणवून घेऊ शकत...
महत्वाच्या बातम्या
सुनेत्रा पवारांवरील ‘गुंगी गुडिया’ टीकेवरून राष्ट्रवादीची काँग्रेस भवनवर धडक
News24Pune -
पुणे(प्रतिनिधी)-राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्यावर काँग्रेसने 'गुंगी गुडिया' अशी अत्यंत आक्षेपार्ह टीका केल्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण पेटले असून, त्याचे तीव्र पडसाद मंगळवारी पुण्यातही उमटले. या विधानाचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पुण्यात काँग्रेस भवनवर धडक दिली, ज्यामुळे पोलीस आणि आंदोलकांमध्ये मोठी झटापट झाली. "महिलांचा अपमान सहन करणार नाही" आणि "नारी के सन्मान में, राष्ट्रवादी मैदान...
पुणे-मुंबई
पीएनजी ज्वेलर्सचा थक्क करणारा प्रवास; २० कोटींवरून थेट १०,५०० कोटींच्या उलाढालीवर! डॉ. सौरभ गाडगीळ यांच्या ‘चूझिंग गोल्ड’ पुस्तकाचे प्रकाशन
News24Pune -पुणे(प्रतिनिधी )-महाराष्ट्राच्या व्यावसायिक वर्तुळात मोठी उलाढाल गाजवणाऱ्या आणि तब्बल १९४ वर्षांचा प्रदीर्घ वारसा असलेल्या पीएनजी ज्वेलर्सच्या यशाची गाथा आता पुस्तकरूपात वाचकांना अनुभवायला मिळणार आहे. पीएनजी ज्वेलर्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. सौरभ गाडगीळ यांनी लिहिलेल्या आपल्या २५ वर्षांच्या रोमांचक व्यावसायिक प्रवासावर आधारित 'चूझिंग गोल्ड' या पहिल्या स्मृतीचित्राचे मराठी अभिनेते प्रसाद ओक यांच्या उपस्थितीत प्रकाशन करण्यात आले.या पुस्तकातून त्यांनी अवघ्या...
महत्वाच्या बातम्या
अमित शहा यांच्या पुणे दौऱ्यानिमित्त पुणे शहरात मोठे राजकीय नाट्य : काँग्रेस – भाजप आमने सामने
News24Pune -पुणे(प्रतिनिधि)--केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या पुणे दौऱ्यानिमित्त आज पुणे शहरात मोठे राजकीय नाट्य पाहायला मिळाले. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यासाठी अमित शहा यांच्या या दौऱ्याला काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीने तीव्र विरोध दर्शवत आंदोलन केले. तर त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजपाने काँग्रेस भवन समोर आंदोलन केले.
केंद्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना 'लोकमान्य पुरस्कार' केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या हस्ते प्रदान करण्यात...
महत्वाच्या बातम्या
स्वातंत्र्य म्हणजे केवळ मनात येईल ते करणे नव्हे : अजित डोवाल यांचे तरुणांना आवाहन
News24Pune -
पुणे(प्रतिनिधी)-आजच्या युवकांनी लोकमान्यांची राष्ट्र उभारणीची परिकल्पना काय होती, याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. आजच्या तरुणांना वाटते की स्वातंत्र्य म्हणजे केवळ स्वतःच्या इच्छेने किंवा मनात येईल ते करणे; पण स्वातंत्र्य म्हणजे एवढेच नव्हे, असे वक्तव्य भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी आजच्या तरुण पिढीला उद्देशून शनिवारी केले.राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना पुण्यात आयोजित एका भव्य सोहळ्यात लोकमान्य टिळक ट्रस्टच्या...
महत्वाच्या बातम्या
राष्ट्रीय सुरक्षेच्या ‘चाणक्या’चा राजकीय ‘चाणक्या’च्या हस्ते गौरव – देवेंद्र फडणवीस ; अजित डोवाल यांना मानाचा लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान
News24Pune -
पुणे (प्रतिनिधी)-"राष्ट्रीय सुरक्षेच्या क्षेत्रात ज्यांना 'चाणक्य' मानले जाते, अशा अजित डोवाल यांना आज मानाचा लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान करण्यासाठी राजकीय क्षेत्रातील 'चाणक्य' म्हणजेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह स्वतः उपस्थित राहिले आहेत. हा खऱ्या अर्थाने एका धुरंधराचा गौरव करण्यासाठी दुसऱ्या धुरंधराचा झालेला आगमनाचा दुग्धशर्करा योग आहे," अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या कार्याचा गौरव ...














