शिल्लक राहिलेल्या डाळीपासून कसा बनवाल सांबार पराठा?


बऱ्याचदा जेवण झाल्यानंतर डाळ अर्थात वरण अथवा सांबार शिल्लक राहिलेले असते. सकाळी टेस्टी नाश्ता आपल्याला बनवायचा असतो परंतु, बऱ्याचदा आपल्याला चटकन काही सुचत नाही. मुलांसाठी सहज काय बनवावे जे त्यांना चवदार लागेल असा प्रश्न पडतो अशावेळी तुमच्यासाठी सांबार परांठा हाच तुमच्या समस्येवर तोडगा आहे. उरलेल्या डाळीपासून सांबार पराठा घरी सहज बनवता येतो. जाणून  घेऊ या त्याची बनवण्याची कृती..

सांबार पराठे बनवण्यासाठी साहित्य

सांबार पराठे बनवण्यासाठी फारच कमी साहित्य आवश्यक आहे. गरजेनुसार आपण भाज्या वाढवू शकता किंवा नसल्यास आपण आहे त्यात भागऊ शकता. यासाठी  सांबार डाळ,  दोन वाट्या पीठ, चवीनुसार मीठ, तूप, गाजर, पालक

अधिक वाचा  राजा उदार नाही, उधार झाला आणि हाती भोपळा आला- देवेंद्र फडणवीस

 सांबार पराठा तयार करण्याची पद्धत

सांबार पराठा करण्यासाठी प्रथम एका भांड्यात पीठ घ्या. आता त्यात सांबार डाळ किंवा उरलेल्या डाळ घाला. नंतर चवीनुसार मीठ वाढवा. आता संपूर्ण कणिक मळून घ्या. ते मळल्यानंतर काही मिनिटांसाठी बाजूला ठेवा.

आता त्यांचे कणिक बनवून त्यात कोरडे पीठ घाला. नंतर तूप सोडा. आता पुन्हा त्यावर तूप लावून त्याला त्रिकोणी आकार द्या. आता या त्रिकोणी पराठ्यावर  कोरडे पीठ घाला व त्याच आकारात लाटून घ्या. आता तवा गरम करा व त्यावर हा पराठा टाका. त्याला तूप लावा आणि सोनेरी रंग येईपर्यंत दोन्ही बाजूने चांगला भाजून घ्या. आपल्याला हवा असल्यास आपण त्याला लच्छा पराठ्याच्या आकारातही लाटू शकता. खाण्यास ते अधिकच स्वादिष्ट लागतील. आपण मुलांच्या डब्यातही हे पराठे देऊ शकता.  

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love