50 हजारांची लाच घेताना पुणे महापालिकेची महिला अधिकारी एसीबीच्या जाळ्यात


पुणे – येत्या 30 रोजी निवृत्त होणार असलेल्या पुणे महापालिकेतील महिला अधिकारी मंजुषा इधाते या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात अडकल्या. मंजूषा इधाते या पुणे महानगरपालिकेत मुख्य विधी अधिकारी (टेक्निकल ऍडव्हायझर) या पदावर काम करतात.  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना सोमवारी त्यांच्या दालनात 50 हजारांची लाच घेताना रंगेहात पकडल्याने एकाच खळबळ उडाली आहे. दरम्यान, या प्रकरणी त्यांच्यावर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया संध्याकाळी उशिरापर्यन्त सुरू होती.

पुण्यातील एका बांधकाम व्यावसायिकाने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. तक्रारकर्ता विकास हस्तांतरण अधिकाराच्या मंजुरीसाठी विधी विभागाकडे आला होता. यावेळी त्याची मंजुरी देण्यासाठी 50 हजार रुपयांची मागणी मंजुषा यांच्याकडून करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. त्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केल्यानंतर मंजुषा इधाटे यांच्या दालनातच पैसे घेताना त्यांना अटक करण्यात आली आहे.

अधिक वाचा  पुण्यात म्युकर मायकोसीसचा वाढता प्रादुर्भाव: 1 जून पासून महापालिका करणार घरोघरी जाऊन सर्वेक्षण

तक्रारदार याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला याची माहिती दिली. या माहितीची खातरजमा केल्यानंतर लाचलुचपत विभागाने पुणे महापालिकेत सापळा रचला होता. त्यानंतर आज सायंकाळच्या सुमारास 50 हजाराची लाच स्वीकारताना या महिलेला रंगेहात पकडण्यात आले. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love