Mocca action against gang leader Vitthal Mahadev Shelar along with 17 accomplices in Sharad Mohol murder case

Sharad Mohol Murder Case: शरद मोहोळ खूनप्रकरणात टोळी प्रमुख विठठल महादेव शेलार याच्यासह १७ साथीदारांविरुद्ध मोक्का कारवाई

क्राईम पुणे-मुंबई
Spread the love

Sharad Mohol Murder Case: कुख्यात शरद मोहोळ खून प्रकरणात (Sharad Mohol Murder Case) टोळी (Gang) प्रमुख विठठल महादेव शेलार(Vitthal Mahadeo Shelar) याच्यासह १७ साथीदारांविरुद्ध मोक्का(Mocca) कारवाई करण्यात आली आहे. गुन्हे शाखेने(Crime Branch) पाठविलेल्या टोळी कारवाईच्या प्रस्तावावर पोलीस आयुक्त(Police Comissioner) रितेश कुमार(Ritesh Kumar) यांनी मोक्काचा (mocca) दणका दिला आहे. गुन्हे शाखेने संबंधित टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत. तर मुख्य आरोपी विठ्ठल शेलारचा(Vitthal Shelar) शोध घेतला जात आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी मोक्कानुसार केलेली ही ११४ वी कारवाई आहे. (Mocca action against gang leader Vitthal Mahadev Shelar along with 17 accomplices in Sharad Mohol murder case)

साहील ऊर्फ मुन्ना संतोष पोळेकर(Munna Santosh Polekar) (वय २०), नामदेव महिपती कानगुडे (वय ३४), विठ्ठल किसन गांडले (वय २० सर्व रा. सुतारदरा, कोथरुड), अमित मारुती कानगुडे (वय २४ रा. पर्वती,) चंद्रकांत शाहु शेळके (वय २२ पर्वती), विनायक संतोष गव्हाणकर (वय २० रा. पौड रोड, मुळशी) रविंद्र वसंतराव पवार (वय ४० रा. नांदे गाव, ता. मुळशी) संजय रामभाऊ उढाण (वय ४३ रा. उजवी भुसारी, कोथरूड), सतीश संजय शेडगे (वय २८ रा. माथवाडी फाटा, भुगाव), धनु उर्फ धनंजय मारूती वाटकर (वय २५ रा. सैदापुर कराड,ता.कराड), नितीन अनंता खैरे ( वय ३४ रा. गादिया इस्टेट, कोथरूड) आदित्य विजय गोळे (वय २४ रा. पिरंगुट, ता. मुळशी ) संतोष दामोदर कुरपे (वय ४९ रा. कोथरूड), रामदास उर्फ वाघ्या नानासाहेब मारणे (वय ३६ रा. उरवडे,ता. मुळशी)विठठल महादेव शेलार (वय ३६ रा. मु. बोथरवाडी, पो. उरवडे, ता. मुळशी) (टोळी प्रमुख), प्रितसिंग ( रा. उमरठी, मध्य प्रदेश), गणेश मारणे (रा. कर्वेनगर) अशी कारवाई केलेल्यांची नावे आहेत.

आरोपी विठठल महादेव शेलार ( टोळी प्रमुख) याने संघटीतपणे  टोळया चालवुन बेकायदेशीर मार्गाने आर्थिक लाभ घेतला आहे. त्याच्याविरुद्ध गंभीर स्वरुपाचे २१ गुन्हे दाखल आहेत. संबंधित टोळीविरुद्ध मोक्काचा प्रस्ताव एसीपी सुनील तांबे यांनी पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांच्यावतीने अपर आयुक्त रामनाथ पोकळे यांना सादर केला. त्यानुसार पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी टोळीविरुद्ध मोक्का कारवाई केली. ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, उपायुक्त अमोल झेंडे,  एसीपी सुनिल तांबे, पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, एपीआय विवेक पाडवी,  पोलीस अंमलदार, सुनिल राऊत, शरद वाकसे,  नितीन कांबळे, नितिन काळे, गणेश ढगे यांनी केली.   

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *