gtag('js', new Date());
  • Home
  • पुणे-मुंबई
  • ‘बाई पण भारी देवा!’ : न्यू सांगवीत रंगणार स्त्रीत्वाचा जागर
तनुश्री स्नेहमेळावा बाई पण भारी देवा कार्यशाळा

‘बाई पण भारी देवा!’ : न्यू सांगवीत रंगणार स्त्रीत्वाचा जागर

Spread the love

पुणे(प्रतिनिधी)- तनुश्री स्नेहमेळावा परिवाराद्वारे तनुश्री संस्कार साधना या नावाने स्त्रीला स्वतःला जोडणारा, स्वतःला उभा करणारा ‘बाई पण भारी देवा’ या अनोख्या थीमच्या माध्यमातून विनामूल्य कार्यशाळेचे अयोजन करण्यात आले आहे. या वर्षी मधुरा बाचल आणि झेलम चौबळ यांना तनुश्री ‘जन संस्कार पुरस्काराने’ सन्मानीत करण्यात येणार आहे.

रविवार, दि.१ मार्च २०२६ रोजी सकाळी ८.३० ते दुपारी १२.३० वाजेपर्यंत न्यू सांगवी येथील साई चौक येथील संस्कृती लॉन्स मध्ये याचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती डॉ. सुप्रिया गुगळे आणि डॉ. तन्वी खाबिया (गुगळे) यांनी पत्रकार परिषदेत दिली.
डॉ. सुप्रिया गुगळे यांनी सांगितले की, ‘बाई पण भारी देवा’ हा सोहळा तिच्या अस्तित्वाचा गौरव, सामर्थ्याचा सन्मान आणि आत्मविश्वासाला नवी दिशा देण्यासाठी आहे. हा सोहळा स्त्री शक्तीला प्रणाम करण्यासाठी, तिच्या आत्मविश्वााला नवे पंख देण्यासाठी आणि तिच्या ‘मी’ ला पुन्हा उजाळा देण्यासाठी आहे.
डॉ. तन्वी खाबिया म्हणाल्या,“तनुश्री स्नेहमेळाव्याचे हे १३ वर्ष असून या वर्षी मधुरा बाचल आणि झेलम चौबळ यांना तनुश्री ‘जन संस्कार पुरस्काराने’ गौरविण्यात येणार आहे. सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. ‘बाई पण भारी देवा’ हा कार्यक्रम स्वतःशी जोडणारा, स्वतःला उभं करणारा प्रवास आहे. त्यामुळे या वर्षी अभिनेत्री शर्वरी जैमिनिस (बाई पण भारी देवा), कलाकार किशोर महाबोले आणि कलाकार अश्विनी कासार या शुभेच्छा देतील. तसेच मधुरा बाचल(स्त्री शक्तीचा गौरव), झेलम चौबळ (तिच कर्तृत्वाशाली नेतृत्व), डॉ. सुजाता पाटील (तिचं आरोग्य आणि आयुर्वेद), वीणा गोखले (देणे समाजाचे), हिमांशु बक्षी, उमा नेने (सुरेल साथ) या वेगवेगळया विषयांवर विचार मांडतील तसेच शुभांगी दामले, डॉ. सुनंदा रानडे, एसीपी अनुजा देशमाने या शुभेच्छा देतील. या कार्यक्रमाचे निवेदन वसुंधरा काशीकर या करतील.”
प्रत्येक स्त्रीला तिच्यातील दडलेली शक्ती, आत्मविश्वास आणि स्वाभिमान पुन्हा अनुभवता यावा यासाठी विविध उपक्रम, प्रेरणादायी सत्रे आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आयुर्वेद, संस्कार आणि सकारात्मक विचारांच्या बळावर स्त्रीने स्वतःला सक्षम केले तर तिच्याच हातून घडेल आणि सुंदर, सुदृढ आणि संस्कारित उद्याचे भविष्य हे या कार्यक्रमाचा मुख्य संदेश आहे.

अधिक वाचा  #धक्कादायक: पुण्यात पुन्हा कोरोनाने घेतला एकाच कुटुंबातील चार जणांचा बळी;एकाच आठवड्यात दुसरी घटना

इच्छुकांना सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी विनामूल्य पण आवश्यक आहे. नोंदणी साठी मो.नं., ८००७२३२०११, +९१८००७१०५३०९ आणि +९१९११२२३१७१५ वर संपर्क साधावा.

डॉ. अनिल व डॉ. सुप्रिया गुगळे यांच्या कार्याचा अल्प परिचयः
डॉ. अनिल गुगळे व डॉ. सुप्रिया गुगळे हे गेल्या २९ वर्षापासून सांगवी येथे गर्भसंस्कार केंद्र यशस्वी रित्या चालवित आहेत. यांच्यातर्फे आयोजित गर्भसंस्कार कार्यक्रमात आतापर्यंत ६५०० पालकांनी सहभाग घेतला आहे. या मध्ये आईची शारीरिक, मानसिक आरोग्य वृध्दी व बाळ निरोगी, आनंदी व सुसंस्कारीत होण्यासाठी केली आहे. त्याचप्रमाणे तनुश्री ब्रम्ह मुहूर्त कार्यक्रम आयोजित केला जातो. यामध्ये आरोग्य संपन्न जीवनशैलीसाठी मार्गदर्शन केेले जाते. गेल्या ५ वर्षारंभा पासून २५ हजार कुटुंबाने ऑनलाईन कार्यक्रमाचा लाभ घेतला.गर्भ संस्कार व सकारात्मक मनाद्वारे नितिमान पिढी निर्माण करण्यासाठी पालकांना मदत केल्या जाते.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Related Posts

Thalapathy Vijay TVK: तामिळनाडूच्या राजकारणात ‘थलपती’ वादळ; एका अपमानाचा असा घेतला बदला!

Spread the love

Spread the loveसुमारे १३ वर्षांपूर्वीची ती घटना आहे. तमिळनाडूच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी एका अभिनेत्याचा असा काही अपमान केला की…


Spread the love
ByByNews24Pune May 12, 2026

पुण्यात राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर शाईफेक; पिस्तूल रोखून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप

Spread the love

Spread the loveपुणे(प्रतिनिधी)— राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर पुणे जिल्ह्यातील आळंदी म्हातोबा शनिवारी सकाळी…


Spread the love
ByByNews24Pune May 9, 2026

पुणे: अनधिकृत शाळांचा सुळसुळाट; पुणे महापालिकेकडून १३ ‘बोगस’ शाळांची यादी जाहीर : प्रवेश न घेण्याचे आवाहन

Spread the love

Spread the loveपुणे(प्रतिनिधी)-शिक्षणाचे माहेरघर मानल्या जाणाऱ्या पुणे शहरात अनधिकृत शाळांचा सुळसुळाट वाढला असून, पुणे महानगरपालिकेने यावर कठोर पाऊल…


Spread the love
ByByNews24Pune May 8, 2026

आरएमसी प्लांट शहराबाहेर हलवले जाणार नाही; पुणे आरएमसी असोसिएशनने जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय धुडकावला

Spread the love

Spread the loveपुणे(प्रतिनिधी)—पुणे शहरातील रेडिमिक्स कॉंक्रीट (आरएमसी) प्लांट येत्या सहा महिन्यात शहराच्या हद्दीबाहेर स्थलांतरित करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतल्याची…


Spread the love
ByByNews24Pune May 8, 2026

‘बाई पण भारी देवा!’ : न्यू सांगवीत रंगणार स्त्रीत्वाचा जागर

by News24Pune time to read: <1 min
0