नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)—कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. देशातील कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाणही गेल्या काही दिवसांपासून वाढले आहे. गेल्या 24 तासात देशात नवीन 44,489 कोरोनाबाधित रुग्णांमध्ये वाढ झाली असून आता देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णसंख्या 92,66,706 इतकी झाली आहे. दरम्यान, देशातील प्रमाण हे 93.65 टक्के इतके आहे.
गेल्या 24 तासात देशात 524 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण आतापर्यंत एकूण 1,35,223 जणांचा मृत्यू झाला आहे तर सध्या देशभरात एकूण 4,52,344 सक्रिय (ACTIVE) रुग्ण आहेत.
बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही चांगले असून गेल्या 24 तासात देशात एकूण 36,367 जणांना घरी सोडण्यात आले आहे. आत्तापर्यंत देशात एकूण 86,79,138 कोरोनाग्रस्त रुग्ण बारे होऊन घरी गेले आहेत.