ब्रिटनहून आलेला तरुण कोरोना बाधित:नव्या व्हायरसच्या लागण झाली का याची तपासणी

आरोग्य
Spread the love

पुणे: ब्रिटनहून आलेल्या एक तरुण कोरोना बाधित आढळला आहे; परंतु त्याला ब्रिटनमधील व्हायरसच्या नव्या स्ट्रेनची लागण झाली आहे का, याची तपासणी केली जाणार असून, दोन दिवसांत त्याचा अहवाल येणार आहे. दरम्यान 1 डिसेंबर पासून पुण्यात 542 प्रवासी ब्रिटनहून परतले आहेत. त्यांचा शोध घेउन तपासणी करण्याची मोहीम महापालिकेने सुरू केली आहे.

ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळल्याने पुन्हा एकदा ब्रिटनमध्ये लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झाली आहे. ब्रिटनची राजधानी असलेल्या लंडनसह अन्य काही भागात या नव्या विषाणूने थैमान घातले आहे. तेथून अन्य देशांमध्ये जाणार्‍या नागरिकांची कसून तपासणी केली जात आहे. काही देशांनी ब्रिटनला जाणार्‍या आणि तेथून येणार्‍या विमानसेवा काही काळासाठी स्थगित केल्या आहेत.

गोखलेनगर भागात राहणारा हा 26 वर्षीय तरुण 15 दिवसांपूर्वी ब्रिटनहून पुण्यात आला. नियमाप्रमाणे त्याचे विलगीकरण करण्यात आले. त्याला मात्र त्याला करोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्याला करोनाची कोणतीही लक्षणे नाहीत, परंतु त्याला जी लागण झाली आहे ती ब्रिटनमधील नव्या व्हायरसची आहे का याची तपासणी करणे आवश्यक आहे. ती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *