असंवेदनशिलतेची परिसीमा: कोरोनाच्या भीतीने मृतदेह सह तास पडून


पुणे-—पिंपरी-चिंचवड मधील महात्मा फुले नगर येथील एका कामगाराचा हृदयरोगाने मृत्यू झाला परंतु कोरोंनाच्या भीतीने हा मृतदेह तब्बल सहा तास तसाच राहिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अखेर या भागातील सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र ननावरे यांनी पुढे येत त्यांच्या सहकाऱ्यांसाह  तो मृतदेह रुग्णालयात नेला त्याच्यावर अंत्यसंस्कार केले. या असंवेदनशीलते मुळे माणुसकी  संपली आहे की काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.       

कोरोनाच्या भीतीने सहा तास मृतदेह घरातच पिंपरी-चिंचवडमधील महात्मा फुले नगर येथे प्रसाद कुमार गुप्ता नावाचा व्यक्ती जो मूळचा बिहार येथील आहे. तो कुटुंबासह पिंपरीत राहायचा, शहरात मोलमजुरी करू कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवत असे. परंतु, सहा महिन्यांपूर्वी कोरोनाचे मोठे संकट शहरासह जगावर आले आणि लॉकडाऊन घोषीत करण्यात आले, रोजगार ठप्प झाला. काही दिवसांनी मयत प्रसाद यांनी त्यांचं कुटुंब मूळ गावी बिहार येथे हलवले ते स्वतः पुन्हा शहरात दाखल झाले.

अधिक वाचा  गणेश उत्सव मंडळासमोर ढोल पथकांना स्थिर वादन करण्यासाठी परवानगी देण्याची मंडळांची मागणी

घरात ते एकटेच राहात होते. परंतु, शुक्रवारी पहाटे च्या सुमारास हृदय विकाराच्या झटक्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. काही तास त्यांचा मृतदेह घरातच पडून होता. शेजाऱ्यांनी हा व्यक्ती बाहेर का येत नाही म्हणून पाहिले असता त्यांचा मृतदेह दिसला. मात्र, कोरोनाच्या भीतीमुळे एकही व्यक्ती त्यांच्या मृतदेहाला हात लावायला तयार नव्हता.अखेर सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र ननावरे आणि त्यांच्या सहकारी मित्रांनी मृतदेह घराबाहेर काढून तो यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात नेला. मृत्यू कशामुळे झाला यासाठी शवविच्छेदन करण्यास डॉक्टरांना सांगितले. तेव्हा, त्यांचा मृत्यू हा हृदय विकाराच्या झटक्याने झाल्याचे स्पष्ट झाले. रात्री उशिरा मयत कामगार प्रसाद यांच्यावर जितेंद्र ननावरे यांनी विधिवत अंत्यसंस्कार केले. त्या अगोदर त्यांच्या घरच्या व्यक्तींना व्हिडिओ कॉल द्वारे अंतिम दर्शन घडवून आणले, असे जितेंद्र ननावरे यांनी सांगितले

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love