‘फेविपिरविर’ (फॅबिफ्ल्यू)च्या उपचाराने कोरोनाग्रस्तरुग्ण बरा होण्याचा कालावधी कमी झाल्याचे निष्पन्न


पुणे– कोरोना विषाणूच्या पुनर्निर्मितीला रोखणा-या ‘फेविपिरविर’‘Favipirvir’ (फॅबिफ्ल्यू)(Fabiflu) या तोंडावाटे घेण्याच्या  औषधाच्या उपचाराने सौम्य ते मध्यम कोरोनाग्रस्त  रुग्ण बरा होण्याचा कालावधी कमी झाल्याचे निष्पन्न झाल्याचा दावा या औषधाची निर्मिती करणाऱ्या  ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्सने केला आहे.  तिस-या टप्प्याच्या रँडमाइज्ड चाचणीत ही निरीक्षणे नोंदली गेली असून इंटरनॅशनल जर्नल ऑफ इन्फेक्शस डिसीजेस (आयजेआयडी) मध्ये प्रसिद्ध झाली आहेत. 

आयजेआयडी हे अमेरिकेतील इंटरनॅशनल सोसायटी फॉर इन्फेक्शस डिसीजेस या संस्थेतर्फे प्रकाशित होते. फेविपिरवीर ची परिणामकारकता आणि सुरक्षितता यावरचा हा लेख डॉ. झरीर उदवाडिया आणि इतर सांशोधकांनी संयुक्तपणे लिहिला आहे. 

फेविपिरवीर (उत्पादनाचे नाव फॅबिफ्ल्यू) ची तिस-या टप्प्याची चाचणी रँडमाइज्ड पद्धतीने देशभरातून निवडलेल्या १५० रुग्णांवर घेण्यात आली. कोरोना लागण झाल्याचे निदान  झाल्यापासून ४८ तासात  फेविपिरवीरची परिणामकारकता आणि सुरक्षितता आणि  सर्वसाधारण शुश्रूषा मिळालेल्या आणि फक्त सर्वसाधारण शुश्रूषा मिळालेल्या सौम्य ते मध्यम कोरोनाग्रस्त रुग्णांच्या प्रकृतीतील बदलाचे निरीक्षण नोंदणे हे या चाचणीचे उद्दिष्ट होते.  फेविपिरवीरचे उपचार मिळालेले रुग्ण बरे होण्याचा काळ कमी होता आणि त्यांना ऑक्सिजन देण्याची गरज कमी प्रमाणात लागणे असे इतरही फायदे झाल्याचे या चाचणीत दिसून आले. शिवाय, फेविपिरवीर चा उपचार केलेल्या रुग्णांना इतर रुग्णांपेक्षा लवकर घरी पाठवण्यात आले असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.  

अधिक वाचा  पुण्यात डेल्टा प्लसचा शिरकाव : पहिला रुग्ण सापडला

याबाबत बोलताना मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयाचे डॉ. झरीर उदवाडिया  म्हणाले,  कोव्हिड -१९ वरील  कोणत्याही औषधाची परिणामकारकता रुग्णालयात घेतलेल्या चाचण्यांच्या निरीक्षणांवरून सिद्ध झाली पाहिजे.  त्यांनी  १५० रुग्णांवर  ती चाचणी सुनियोजित केली  होती आणि त्यातून असे दिसून आले की फेव्हिपिरविर मुळे संसर्ग लवकर नष्ट झाला आणि रुग्ण बरा होऊन घरी जाण्याचा काळ लक्षणीयरीत्या कमी झाला.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love