#सावधान: पुणे शहर आणि जिल्ह्यात कोरोनाचे संकट वाढते आहे


पुणे- पुणे जिल्ह्यात कोरोनाचे संकट दिवाळीअगोदर बऱ्याच प्रमाणात कमी झाले होते. परंतु, आता पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसतो आहे. गेल्या 16 नोव्हेंबरला 359 नवीन रुग्णांची नोंद झाल्यानंतर पुणेकरांना दिलासा मिळाला होता. परंतु, कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. बुधवारी दिवसभरात पुणे जिल्ह्यात तब्बल 1 हजार 25 नवीन रुग्णांची वाढ झाल्याने पुणेकरांची चिंता वाढली आहे.The crisis of corona is increasing in Pune city and district

गेल्या महिनाभरात पुणे शहर आणि जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली होती. 35 दिवसांनंतर पुन्हा एकदा 1 हजारापेक्षा जास्त रुग्णांची नोंद झाली आहे. यापूर्वी 21 ऑक्टोबर रोजी 1 हजार 20 रुग्ण आढळले होते.

अधिक वाचा  पुण्यातील शाळा 13 डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय: महापौर

16 नोव्हेंबरला आतापर्यंत सर्वात कमी म्हणजे फक्त 359 रुग्णांची नोंद झाली होती. गेल्या 24 तासांत जिल्ह्यात एकूण 11 हजार 572 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढताना पाहायला मिळत असल्यानं प्रशासनाकडून कोरोना चाचण्या वाढवण्यात आल्या आहेत. त्यामुळे रुग्णांची संख्याही वाढताना दिसत आहे. पुणे जिल्ह्यात सध्या विविध रुग्णालयात 4 हजार 382 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर 6 हजार 357 रुग्ण घरातच उपचार घेत आहेत.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love