स्वाभिमानी शेतकरी आणि इतर संघटनांचा अंबानी कॉर्पोरेट हाऊसवर २२ डिसेंबरला मोर्चा


पुणे— दिल्ली येथे सुरू असलेले अभूतपूर्व व ऐतिहासिक शेतकरी आंदोलन आता तिसऱ्या आठवड्यात प्रवेश करते आहे केंद्र सरकारला हे आंदोलन मोडून काढण्यासाठी केंद्र सरकार सर्व हातखंडे वापरूनही यश मिळत नाही म्हटल्याने आता आक्रमकपणे या आंदोलनाची बदनामी सुरू केली आहे. मात्र, महाराष्ट्रातील शेतकरी या  आंदोलनात दिल्लीच्या सीमेवर लढणाऱ्या शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून उभा आहे आणि म्हणून दिनांक २२ डिसेंबर रोजी मुंबई येथील अंबानी कॉर्पोरेट हाऊसवर स्वाभिमानी शेतकरी संघटना, प्रहार संघटना, शेतकरी कामगार पक्ष व लोक संघर्ष मोर्चा हे एकत्रित मोर्चा काढणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत सांगितले. दरम्यान, दिल्लीतील आंदोलनाला पाठींबा असलेल्या संघटना या मोर्चात सामील झाल्या तर आमची हरकत नसल्याचे राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले.

अधिक वाचा  युवक कॉंग्रेसचे माहिती प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या घरासमोर आंदोलन

या पत्रकार परिषदेला हमाल पंचायतचे नेते बाबा आढाव, प्रतिभा शिंदे आदी उपस्थित होते.

शेट्टी म्हणाले,  या आंदोलनाला ज्या संघटना व पक्ष पाठींबा देत आहेत त्यांना लक्ष करून पंतप्रधान मोदी शेतकऱ्यांना भ्रमित करून त्यांच्या विरोधी षडयंत्र केले जात असल्याचा आरोप करीत आहेत तर भाजपाचे खासदार व प्रमुख नेते बेताल वक्तव्य करत शेतकरी कायदे है कसे शेतकरयांना तापदायक आहेत हे सांगण्यासाठी पत्रकार परिषदा घेत आहेत म्हणून आता या देशातील शेतकरी आणि शेतमजुरांच्या संघटणांनी केंद्रसरकारच्या या हुकूमशाही अरेरावीला रस्त्यावर उतरून उत्तर देण्याची वेळ आली आहे.

दिल्लीत  सुरू असलेले शेतकरी आंदोलन आपल्या भूमिकेवर ठाम आहे आणि त्यांनी घेतलेले आक्षेप हे केवळ शेती आणि शेतकरी यांच्या हितापूरतेच मर्यादित नाहीत तर या देशातीत संसदीय निर्णय प्रक्रिया, संघराज्य प्रणालीवर केलेत आक्रमण, मूठभर उद्योगपतींना पूर्वतयारी करायला लावून त्यांच्या हितासाठी कायदे करण्याची घाई व त्यांच्या साठी बनवलेल्या कायद्यांना जनता,जनसंघटना आणि विरोधी पक्षांनी विरोध केला तर त्यांना देशद्रोही, अतिरेकी, नक्षली, आणि राजकीय हेतूनी प्रेरित संबोधून दडपशाही करण्याची रणनीती हा सर्व खेळ आता जनतेपुढे उघड झाला आहे आणि त्यामुळे देशाच्या सर्वच स्तरातून या आंदोलनाला पाठींबा वाढत चालला आहे आणि त्यामुळे भाजपा सरकार गडबडून गेले आहे.

अधिक वाचा  यह तो बस अंगडाई है, आगे तो लढाई है - चंद्रकांत पाटील

बाबा आढाव म्हणाले, आमचा राजू शेट्टी यांच्या आंदोलनाला पूर्ण पाठींबा आहे. स्वातंत्र्योत्तर काळात पहिल्यांदा शहरी मंडळी शेतकऱ्यांबरोबर असल्याचे चित्र आहे. केवळ बरोबर नव्हे तर ते कृतीतून बरोबर आहेत. केंद्र शासन शेतकऱ्यांना सांगते की आम्ही तुम्हाला मोकळं केले. परंतु, सरकारने स्वत:ची जबाबदारी टाळली आहे. सर्व क्षेत्रातील लोक सांगत असतानाही ऐकायला तयार नाही. दुनिया काय म्हणते आहे हे जरा मोदींनी ऐकावे असा टोला त्यांनी लगावला. केवळ शब्दांचा खेळ सुरु आहे. सरकार तपशिलात बोलायला तयार नाही. कोणाला विचारायला तयार नाही. त्यामुळे आमच्या अडचणी वाढत आहेत. दोष केवळ कायद्यांचा नाही तर तुमच्या नाकर्तेपणाचा आहे अशी टीका त्यांनी केली.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love