ईडीमार्फत नोटिसा पाठवायच्या हेच भाजपचे सध्याचे धोरण : जयंत पाटील

The party is not owned by anyone
The party is not owned by anyone

पुणे–केंद्र सरकारविरोधात जे बोलतात, त्यांना ईडीमार्फत नोटिसा पाठवायच्या आणि उपद्रव वा जाणीवपूर्वक त्रास द्यायचा, हेच भाजपाचे सध्याचे धोरण असल्याची टीका राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी सोमवारी येथे केली.

पुण्यातील एका कार्यक्रमासाठी पाटील पुण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. माजी मंत्री एकनाथ खडसे व खासदार संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीने नोटीस पाठविल्याच्या पार्श्वभूमीवर बोलताना ते म्हणाले, विरोधात बोलणाऱयांना जाणीवपूर्वक त्रास देणे, हा भाजपाच्या धोरणाचाच एक महत्त्वपूर्ण भाग बनला आहे. अशी कितीतरी उदाहरणे आत्तापर्यंत सापडतील. एव्हाना सगळय़ा देशाला हे कळून चुकले आहे. मात्र, चौकशीअंती यातून काहीही निष्पन्न होणार नाही आणि काही साध्यदेखील होणार नाही.

अधिक वाचा  अदानी आणि अंबानींसाठी शेती कृषी क्षेत्र खुलं करण्याचा केंद्र सरकारचा डाव-राजू शेट्टी

चंद्रकांतदादांविषयी शक्यतो बोलत नाही

भाजपाकडून सरकार पाडण्यासाठी विविध मार्गाने दबाव आणला जात असल्याच्या संजय राऊत यांच्या विधानासही त्यांनी दुजोरा दिला. ज्या अर्थी राऊत हे म्हणत आहेत, त्या अर्थी ते खरेच आहे, अशा शब्दांत त्यांनी भाजपाच्या हेतूंबद्दल शंका उपस्थित केली. मात्र, चंदकांतदादांबद्दल कोणतेही विधान करण्यास त्यांनी नकार दिला. मी. चंद्रकांतदादांबद्दल काहीही बोलणार नाही. त्यांच्याविषयी मी शक्यतो बोलत नाही, असा चिमटा त्यांनी काढला.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love