खरंतर मी आपणास शरद पवारांचा पंटर, खबऱ्या, चमचा असा उल्लेख करु शकलो असतो परंतु….गोपीचंद पडळकरांचा पलटवार

राजकारण
Spread the love

पुणे- शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दैनिक सामनाच्या अग्रलेखात भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचा ‘फेकुचंद; असा उल्लेख केल्याने दोघांमध्ये वाकयुद्ध सुरु झाले आहे. पडळकर यांनी संजय राऊत याच्यावर पलटवार करत  खरंतर मी आपणास शरद पवारांचा पंटर, खबऱ्या, चमचा असा उल्लेख करु शकलो असतो परंतु, ते माझे संस्कार आणि संस्कृती नाही असे म्हटले आहे. तुमचा पगार किती? बोलता किती? असा सवाल करत राऊत यांच्यावर टीका केली आहे.

2 दिवसीय हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी गोपीचंद पडळकर यांनी धनगरी पेहरावात ढोल वाजवून सरकारचं लक्ष धनगर समाजाच्या प्रश्नाकडे वेधण्याचा प्रयत्न केला होता. त्यावरुन संजय राऊत यांनी सामनाच्या अग्रलेखात गोपीचंद यांचा उल्लेख फेकूचंद असा केला होता. त्यावर बोलताना, “मी आमदार झालो तरी माझ्या समाजाशी, समाजाच्या सुखदु:खांशी मी नाळ तोडलेली नाही. माझ्या दु:खी धनगर समाजाचे दु:ख वेशीवर टांगण्यासाठी मी एकदा नाही हजारवेळा येईन. ते स्वातंत्र्य आपण वा आपल्या सरकारने मला दिलेले नाही. ते स्वातंत्र्य मला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेने दिले आहे. पण सत्तेच्या धुंदीत त्यांची लेखणी फक्त विरोधकांवर चालते. मराठा मोर्चांना मुका मोर्चा म्हणणाऱ्या सामनाकडून दुसरी अपेक्षाही काय करणार. राऊतांनी आपली लेखणी कधी धनगर आरक्षण व भटक्यांच्या प्रश्नांसाठी झिजवली याचेही उत्तर द्यावे. सगळं लक्ष मुंबईच्या नाईट लाईफमध्ये असणाऱ्या बोलघेवड्यांना महाराष्ट्रात काय सुरु आहे याचा अंदाज तरी कसा येणार”, अशी टीकापडळकरांनी केली आहे

 “खरंतर मी आपणास शरद पवारांचा पंटर, खबऱ्या, चमचा असा उल्लेख करु शकलो असतो. परवाच्या सामना दैनिकाच्या अग्रलेखात आपण माझा उल्लेख फेकूचंद असा केला. त्या पद्धतीनं आपला उल्लेख मलाही करता आला असता. पण तो माझा संस्कार आणि संस्कृती नाही. प्रत्येकाशी नम्रपणे बोलले पाहिजे. प्रत्येकाचा उल्लेख सन्मानाने केला पाहिजे हा संस्कार मला माझ्या आईवडिलांनी दिला आहे”, अशा शब्दात पडळकर यांनी राऊतांना खडे बोल सुनावले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *