Come to Ayodhya on January 22 if you dare

जून नंतर लसीचा तुटवडा संपेल – देवेंद्र फडणवीस

पुणे-मुंबई राजकारण
Spread the love

पुणे-कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आटोक्यात आली तरी तिसऱ्या लाटेची तयारी करावी लागेल. केंद्र सरकार लसीकरणाचा कार्यक्रम करत आहे. राज्य त्यात भर घालत आहे आणि पुणे महापालिका त्यात भर घालेल याची आम्हाला खात्री आहे. जून नंतर ही लसी उपलब्धतेची परिस्थीती सुधारेल असा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

पुण्यातील नायडू रुग्णालयातील ऑक्सिजन जनरेटिंग प्लांटचे ऑनलाइन उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.

फडणवीस यांनी पुणे महापालिकेचा कामाचे कौतुक केले तसेच लसींचा तुटवडा जून महिन्यात संपेल असाही दावा केला. फडणवीस म्हणाले “या लाटेत सर्वात जास्त ऑक्सिजन ची कमतरता आपल्याला जाणवली. सर्व ऑक्सिजन वैद्यकीय कारणासाठी द्यावा लागला. प्रशासनाला तणावात राहावे लागत होते. मोदींनी ऑक्सिजन ची नीट व्यवस्था लावली. प्लांट इम्पोर्ट करणे हा त्यावरचा मार्ग होता. आणि हे केले त्याबद्दल महापालिकेचे अभिनंदन. पंतप्रधानांचा पुढाकाराने ८०० ऑक्सिजन प्लांट ची निर्मिती होते आहे. या लाटेत सर्वाधिक परिणाम झालेल्या ठिकाणां मध्ये पुणे होतं. पुण्यानी इतका ताण असूनही टेस्टिंग कमी होऊ दिलं नाही. आत्ता संख्या आटोक्यात आली तरी तिसऱ्या लाटेची तयारी करावी लागेल. केंद्र सरकार लसीकरणाचा कार्यक्रम करत आहे. राज्य त्यात भर घालत आहे. आणि महापालिका त्यात भर घालेल याची आम्हाला खात्री आहे. जून नंतर ही लसी उपलब्धतेची परिस्थीती सुधारेल.”

चंद्रकांत पाटील म्हणाले, सध्या जो गोंधळ सुरू आहे त्यावरून काही मार्ग काढला पाहिजे. चांगलं काय करता येईल ते पाहिले पाहिजे.”

महापौर मुरलीधर मोहोळ यांनी यावेळी बोलताना सांगितले,” मध्यंतरी ऑक्सिजन चा तुटवडा जाणवत होता. आता ऑक्सिजन संपतो का काय अशी भीती जाणवायला लागली. त्यानुसार ८ऑक्सिजन प्लांट शहरात तयार केले आहेत. थेट अमेरिकेतून या ऑक्सिजन प्लांट साठी साहित्य आणले आहे. पुढची लाट आलीच तर महापालिका आत्मनिर्भर होणार आहे.”

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *